आपण म्हणतो की संपूर्ण देशभरात दिवाळीचा उत्साह सारखाच आहे. देशभरात एकाच पद्धतीने दिवाळी साजरी केली जाते, पण हा समाज साफ चुकीचा आहे. कारण, भारतातल्या प्रत्येक राज्यात प्रत्येक कोस कोसावर दिवाळीचे रंग वेगळेच आहेत. भारतात काही ठिकाणी उत्साहात दिवाळी साजरी करतात, रोषणाई असते तर देशातील काही गावात दिवाळी साजरीच केली जात नाही.
दक्षिण भारतातील वेग-वेगळ्या राज्यांमध्ये दिवाळी हा सण नरक चतुर्दशी म्हणून साजरा केला जातो. देशभरात दिवाळी एकाच दिवशी साजरे केली जाते. पण देशातील काही ठिकाणी दिवाळी एक दिवस आधी साजरी केली जाते. जेव्हा दिवाळीच्या तारखा ओव्हरलॅप overlap होतात तेव्हा ही परिस्थिती होत असते. दक्षिण भारतापेक्षा उत्तर भारतात दिवाळी कशी वेगळी आहे,ती केव्हा आणि कशी साजरी केली जाते याबाबत आपण आज जाणून घेऊयात
उत्तर भारतात अशी साजरी केली जाते दिवाळी
उत्तर भारतात १४ वर्षांच्या वनवासानंतर प्रभू श्रीराम या दिवशी लंकेतून अयोध्येत परत आल्यापासून दिवाळी साजरी केली जाते. असे म्हटले जाते की या दिवशी प्रभू राम अयोध्येत परतल्यावर त्यांच्या लोकांनी म्हणजेच प्रजेने दिवे लावून त्यांचे स्वागत केले. लोक लक्ष्मीपूजन करतात किंवा दिवाळीच्या दिवशी गणेशासोबत देवी लक्ष्मीची आणि सरस्वतीची पूजा करतात.उत्तर भारतात दिवाळीचा सण धनत्रयोदशी या दिवसापासून सुरू होतो. दिवाळीच्या सणाच्या दोन दिवसाआधी हा उत्सव साजरा केला जातो. धनत्रयोदशीला लोक मिठाई तयार करतात, सोन्याचे दागिने, नाणी, चांदीची भांडी इत्यादी वस्तू खरेदी करतात कारण हा दिवस शुभ मानला जातो. उत्तर भारतातील काही भागांमध्ये,एक झाडू देखील खरेदी केला जातो हा झाडू घरातून दारिद्र्य बाहेर काढतो आणि घरात लक्ष्मी आणतो.
दक्षिण भारतात अशी साजरी केली जाते दिवाळी
दक्षिण भारतात श्री कृष्णांचे भक्त जास्त प्रमाणात आहेत. त्यामुळे तिकडे ओनम हा सण मोठ्या उत्साहात साजरा होतो. दिवाळीला तसे फारसे महत्त्व तिकडे नाही. दक्षिणेत ज्या दिवशी भगवान कृष्णाची पत्नी सत्यभामा हिने नरकासुर या राक्षसाचा वध करण्यास सांगितले त्या दिवशी दिवाळी साजरी केली जाते.दिवाळी इकडे एक दिवस आधी म्हणजेच अमावस्येला येते. या दिवसाला दक्षिण भारतात नरक चतुर्दशी असं म्हणतात आणि ही सणाची खरी सुरुवात मानली जाते. देशाच्या उत्तरेकडील भागांच्या तुलनेत दक्षिण भारतात दिवाळीच्या सणानिमित्त कमी धूम असते.
दिवाळीच्या दिवशी लोक नवीन कपडे खरेदी करतात आणि या दिवशी ते मिठाईची देवाणघेवाण करतात आणि त्यांच्या नातेवाईकांना भेट देतात. कर्नाटका आणि आंध्र प्रदेशातील अनेक भागांमध्ये दिवाळीच्या दोन्ही दिवशी फटाकेही फोडले जातात.
परंपरा आणि रूढी काहीही असो शेवटी या सणांचा आनंद महत्त्वाचा. त्यामुळे दिवाळी आमावस्येला साजरी होवो किंवा त्याच्या दुसऱ्यादिवशी लोकांनी तो आनंद उपभोगणं, आणि एकमेकांशी आपुलकीने राहणं महत्त्वाचं.
हे ही वाचा :
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर आज सहा तासांचा ब्लॉक
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून श्रेया बुगडेला मिळांल दिवाळी गिफ्ट