Friday, December 1, 2023

Latest Posts

Diwali 2023, जाणून घ्या यंदाच्या लक्ष्मीपूजनाची तारीख, मुहूर्त आणि महत्त्व

Diwali 2023, जाणून घ्या यंदाच्या लक्ष्मीपूजनाची तारीख, मुहूर्त आणि महत्त्व

दिवाळीसाठी आता अवघे काही दिवस बाकी आहेत. या दिवाळीत लक्ष्मीपूजनाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी लक्ष्मीदेवी आणि गणेश देवतेची पूजा केली जाते. त्यांच्या पूजेशिवाय हा सण अपूर्ण मानला जातो. पण तुम्हाला देखील हा प्रश्न वारंवार मनात येत असेल की दिवाळीत लक्ष्मी आणि गणेशजींच्या पूजेला इतर देवतांपेक्षा इतके महत्त्व का दिले जाते? चला, आज या प्रश्नाचे उत्तर आणि धार्मिक महत्त्व जाणून घेऊयात. माता लक्ष्मी ही संपत्तीचीआणि ऐश्वर्य प्रदान करणारी देवी आहे हे आपण सर्व जाणतो. माता लक्ष्मीच्या कृपेनेच ऐश्वर्य आणि वैभव प्राप्त होते. दिवाळीपूर्वी येणारी शरद पौर्णिमा हा सण लक्ष्मी देवीच्या जयंतीप्रमाणे साजरा केला जातो.

दिवाळीत श्री गणेश यांच्या पूजेचे महत्त्व

गणपती ही बुद्धीची देवता आहे. सनातन हिंदू धर्मात गणपतीच्या पूजेशिवाय कोणतीही पूजा किंवा विधी सुरू केली जात नाही. दिवाळीमध्ये गणपतीची पूजा करण्याचे हेही एक कारण आहे. तसेच धनदेवीच्या उपासनेतून समृद्धीचे आशीर्वाद मिळाल्यानंतर माणसाला सद्बुद्धीची गरज पडते. जेणेकरून तो पैसा योग्य कामांसाठी योग्य ठिकाणी वापरू शकेल. हे प्रथम पूज्य गणेश, आम्हाला बुद्धी आणि योग्य मार्गावर पुढे जाण्याचे वरदान दे, ही प्रार्थना दिवाळीला गणपती देवतेची पूजा करतांना केली जाते.

यावर्षीच्या दिवाळी २०२३ लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्त –

धार्मिक शास्त्रानुसार दिवाळीच्या मध्यरात्री म्हणजेच निशिता काल मुहूर्तावर देवी लक्ष्मी देवीची पूजा केली जाते. धनदेवतेची पूजा करण्यासाठी हा शुभकाळ मानला जातो. यावेळी माता लक्ष्मी घरोघरी फिरत असते आणि देवी लक्ष्मीची पूजा केल्याने हजारो रूपात सर्वव्यापी लक्ष्मी मतेची प्राप्ती होते.

लक्ष्मीपूजनची तारीख आणि मुहूर्त – १२ नोव्हेंबर २०२३, रात्री ११:३९ – १३ नोव्हेंबर २०२३, १२:३२ am (कालावधी – ५३ मिनिटे)

काय आहे लक्ष्मीपूजनाची धार्मिक मान्यता? –

कार्तिक महिन्यातील अमावास्येच्या दिवशी दिवाळी साजरी केली जाते. तर याच्या १५ दिवस आधी कार्तिक महिन्याच्या पौर्णिमेला देवी लक्ष्मीचा सण शरद पौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. धार्मिक मान्यतेनुसार, लक्ष्मी देवीच्या पूजेचा मुख्य दिवस शरद पौर्णिमा आहे तर देवी कालीची पूजा हा दिवाळीचा मुख्य दिवस असावा. याचे कारण म्हणजे अमावस्येची रात्र ही देवी कालरात्रीची असते तर शरद पौर्णिमेची रात्र ही धवल रात्र असते आणि देवी लक्ष्मीचा प्रकट दिन देखील असतो. समुद्रमंथनाच्या वेळी शरद पौर्णिमेला महासागरातून देवी लक्ष्मीचा जन्म झाला.

हे ही वाचा : 

Ahmednagar – परिवहन विभागाचा अनागोंदी कारभार

ढिचॅक दिवाळीच्या रेडकार्पेटवर मराठी कलकारांच्या नवनवीन लूकची आतषबाजी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss