दिवाळी आता अगदी काहीच दिवसांवर आली आहे, दिवाळी म्हटलं की पहिली आठवणारी गोष्ट म्हणजे दिवाळीचा फराळ. फराळाशिवाय दिवाळी होणे शकत नाही. घराघरांमध्ये आता दिवाळीसाठी फराळ बनवण्याची लगबग सुरु झालेली आहे. घरातील महिलांनी एक एक फराळाचा पदार्थ करायला सुरुवात केली असून आज आम्ही तुमच्यासाठी एक फराळाचा खास पदार्थ घेऊन आलो आहोत, तो पदार्थ म्हणजे ‘कारंजी ‘. चला तर आज जाणून घेऊयात खुसखुशीत करंजी बनवण्याची रेसिपी. फराळात बनवली जाणारी ‘करंजी’ हा पदार्थ सगळ्यांनाच आवडते. त्याची रेसिपी भारतात देशभर वेगेवगळ्या प्रकारे, वेगवेगळ्या पद्धतीनं केली जाते. त्यात कारंजी बनवणं म्हणजे अतिशय नाजूक काम. पण कारंजी बनवण्याची चिंता करु नका, कारण अतिशय सोप्या पद्धतीत आज आपण ही रेसिपी पाहणार आहोत.
‘कारंजी’ बनवण्यासाठी लागणारं साहित्य –
३ वाटी किसलेले खोबरे, ३ वाटी बारीक रवा, २ टीस्पून वेलची पावडर, २.२/५ वाटी पिठी साखर, मनुके, सुकामेवा, तूप, १/२ किलो मैदा, चिमूटभर मीठ किंवा चवीनुसार, पाणी (आवश्यकतेनुसार),टाळण्यासाठी तेल.
कारंजी बनवण्याची कृती-
पहिली स्टेप-
कढई गॅसवर गरम करायला ठेवा , त्यामध्ये सूखे खोबरे चांगले भाजून घ्या, ३ ते ४ मिनिटे खोबरे भाजून झाले की ते सर्व परातीमध्ये काढून घ्या. त्याचप्रमाणे रवा पण भाजून घ्या. त्यानंतर आता थोडे तूप घालून त्यामध्ये सुका मेवा भाजून घ्या.हे झालं की सर्व एका मोठ्या परातीमध्ये काढून घेतल्यानंतर आता त्यामध्ये पिठी साखर, वेलची पूड घालून छान एकजीव करा.
दुसरी स्टेप-
एका मोठ्या परतीत मैदा चाळून घ्या, त्यात ४ टेबलस्पून तूप गरम करून त्यावर घाला आणि छान एकजीव करून घ्या. सगळीकडे तूप लागेल असे मिक्स करा आणि पाण्याच्या मदतीने मळून घ्या.त्यानंतर अर्धा तास झाकण लावून ठेवून द्या.
तिसरी स्टेप –
आता हे पीठ परत थोडे मळून घ्या,आणि एक छोटा गोळा घेऊन त्याची पोळी लाटून घ्या,तयार सारण मध्ये ठेवून कडेला पाणी लावून घ्या,आणि साचाने करंजी नीट कापून घ्या,अशाच प्रकारे सर्व पिठाच्या करंज्या करून घ्या.
चौथी स्टेप-
आता कढईत तेल घालून गरम करून घ्या, त्य मध्ये एक एक करंजी सोडून बारीक गॅस वर तळून घ्या, दोन्ही बाजूंनी छान भाजून घ्या आणि काढून घ्या,अशाच प्रकारे सर्व करंज्या भाजून घ्या आणि हवा बंद डब्ब्या मध्ये ठेवा जेणेकरून कारंजी साधळणार नाहीत.
हे ही वाचा :
महाराष्ट्र केसरी २०२३: यंदा होणार दोन महाराष्ट्र केसरीचं आयोजन एक ‘पुण्यात’ तर दुसरी ‘धाराशिवमध्ये’
‘माझ्या हृदयाच्या खूप जवळ असणारा सिनेमा’,पोस्ट शेअर करत नव्या भूमिकेत दिसणार रिंकू