दिवाळीमध्ये विविध खाद्यपदार्थ, गोडाधोडाचे पदार्थ आणि फराळाची मेजवानी असते. हे सारे पदार्थ दिवाळीमध्ये आवर्जून आवडीने बनवले जातात. दरवर्षी नेहमीच्या फराळ आणि गोडाचे पदार्थ बनवण्यापेक्षा काहीतरी वेगळं ट्राय करायचं असेल तर यंदा रव्याच्या मिठाईची रेसिपी नक्की ट्राय करा. या मिठाईची रेसिपी करणं एकदम सोप्प आहे. शिवाय, ही रेसिपी करायला जास्त वेळ देखील लागत नाही. ही रेसिपी झटपट तयार होते. यंदाच्या दिवाळीला ही रेसिपी आवर्जून करून बघा. चला तर मग जाणून घेऊयात या मिठाईच्या रेसिपीबद्दल.
मिठाई बनवण्यासाठी लागणारे साहित्य-
१ कप रवा, १ कप दूध, १ कप पाणी, अर्धा कप साखर, तूप,काजू- बदाम, वेलची पावडर, चिमूटभर केसर.
रव्याची मिठाई बनवण्यासाठीची रेसिपी-
सर्वात आधी गॅसवर एक कढई किंवा पॅन ठेवा त्यानंतर त्यात दूध आणि साखर घालून हे मिश्रण चांगलं ढवळा. या मिश्रणात केशर, वेलची पावडर आणि १ कप पाणी घालून चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्या, एक गोष्ट लक्षात ठेवा की हे मिश्रण तुम्हाला घट्ट करायचे आहे. या मिश्रणातील साखर दुधात चांगल्याप्रकारे मिसळण्यासाठी हे उकळावं, दुधात साखर नीट विरघळल्यानंतर गॅस बंद करा. हे मिश्रण चांगल्या प्रकारे तयार झाल्यावर दुसऱ्या बाजूला पॅनमध्ये तूप घाला व रवा चांगला भाजायाल सुरू करा जोपर्यंत हा रवा सोनेरी होत नाही तोपर्यंत भाजा, यादरम्यान रवा पॅनला चिकटणार नाही याची विशेष काळजी घ्या. आता हा भाजलेला रवा एका ताटात काढून घ्या.
रवा भाजून झाल्यानंतर, आता दुसऱ्या एका खोलगट भांड्यात तूप घालून ते गॅसवर गरम करायला ठेवा. तूप गरम झाल्यावर त्यामध्ये बदाम-काजूचे बारीक काप घालून ते तूपात भाजून घ्या. यानंतर, या झालेल्या मिश्रणात भाजलेला रवा घाला. त्यानंतर, त्यात हळूहळू दूधाचे मिश्रण घाला. आता हे सर्व मिश्रण चांगल्याप्रकारे हलवून घ्या. चांगलं शिजेपर्यंत हे मिश्रण हलवत रहा. त्यानंतर हे मिश्रण ताटात काढून त्यावर केसर टाकून सर्व्ह करा. तुमची रव्याची मिठाई रेडी.
हे ही वाचा :
बिग बॉसच्या घरात अंकिता लोखंडे आणि तिचा पती विकी जैन यांच्यावर थेट चोरीचा आरोप
अनेक वर्षांची परंपरा असलेल्या दर्ग्यात हिंदू- मुस्लिम समाज एकत्र येऊन साजरी करतात दिवाळी