प्रत्येक सणाची आपल्यासाठी स्पेशल असतो, त्यात दिवाळी हा सर्वात महत्वाचा आणि सर्वांचा आवडता सण आहे. कारण, या सणामध्ये अनेक वेग वेगळे फराळ, गोड धोडाचे पदार्थ आणि त्यांची रेसिपी असतात. वेग वेगळ्या प्रकारचे लाडू, शंकरपाळी,चिवडा, करंजी, चकली, कापण्या, अनारसे, शेव, बाकरवडी मुगाच्या डाळीचे लाडू, रव्याचे लाडू, बेसनाचे लाडू अशा अनेक रेसिपींची दिवाळीत मेजवाणीच असते. लाडू हा शब्द ऐकला तरी आपल्या मनात विचार येतो काहीतरी गोड बातमी असावी. कोणतीही चांगली बातमी सांगताना आपण काहीतरी गोड पदार्थ खातो. मग, तो पदार्थ जर लाडू असेल तर ऐकणारी बातमी अजुनच गोड वाटते! लग्न आणि लाडू यांचा एक फार घट्ट संबध आहे. लाडूचे वेगवेगळे आणि असंख्य प्रकार असतात, यंदाच्या दिवाळीच्या फराळाची तयारी घरोघरी सुरु झाली आहे. दिवाळीचा फराळामध्ये वेगवेगळ्या लाडूंपैकी बुंदीचा लाडू हा हमखास बनवलाच जातो. चला तर मग जाणून घेऊयात या बूंदीच्या लाडूची अनोखी रेसिपी….
बुंदीच्या लाडूसाठी लागणारं साहित्य-
प्रत्येकी दोन कप बेसन, तूप, दीड कप साखर, वेलची पूड, केशर पूड,बेदाणे, बदाम काप, चिमूटभर केशरी रंग (हवे असल्यास)
बुंदीच्या लाडूची रेसिपी-
बेसनात केशरी रंग टाकून त्यात पाणी घालून भजीच्या पिठाइतपत घट्ट भिजू द्या, मग कढईत तूप गरम करायला ठेवा. झाऱ्यावर पीठ टाकून कढईवर आपटा म्हणजे तुपात बुंदी पडते. मंद आचेवर ही बुंदी कुरकुरीत तळा. चहाच्या गाळणीने बुंदी पाडल्या तर मोतीचुराप्रमाणे बुंदी बारीक पडते. झालेली बुंदी एका ताटात काढा. दरम्यान साखरेत निम्मे पाणी घाला आणि त्याचा पाक करा. त्यात वेलची, केशर, बेदाणे, बदाम, बुंदी घाला हे सगळं घाला. या सगळ्या गोष्टी मुरल्यावर लाडू वळून घ्या.
हे ही वाचा :
हिंगोली जिल्ह्यात तरुणाने मराठा आरक्षण मिळत नसल्याने आपलं जीवन संपवलं
‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप