यावर्षीची दिवाळी अवघ्या काही दिवसांवर आलेली आहे. त्यामुळे, बाजारात सगळीकडे दिवाळीची लगबग दिसून येत आहे. विविध प्रकारचे आकाशकंदील, सजावटीच्या वस्तू, दिवे, पणत्या, फराळाचे वेग वेगळे पदार्थ आणि नाव नवीन कपडे इत्यादी गोष्टींची रेलचेल पहायला मिळतेयं.आपल्या देशात दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात आणि चैतन्याने साजरा केला जातो. दिवाळी म्हणजे उत्साहाचा,आनंदाचा, ऊर्जेचा आणि प्रकाशाचा सण असतो. यंदाची दिवाळी ९ नोव्हेंबरपासून सुरू होणार असून १५ नोव्हेंबरला भाऊबीज झाल्यानंतर, दिवाळीची समाप्ती होईल.यंदाचा दिवाळी पाडवा कधी आहे? पाडव्याचा शुभ मुहूर्त कधी? त्याविषयी आपण आज जाणून घेणार आहोत.
दिवाळी पाडवा/ बलिप्रतिपदा कधी आहे?
साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक असलेला हा दिवाळी पाडवा यंदा १४ नोव्हेंबर म्हणजेच मंगळवारी साजरा करण्यात येणार आहे. लक्ष्मीपूजन झाले की, त्याचा दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी दिवाळी पाडव्याचा सण साजरा केला जातो. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला हा पाडव्याचा दिवस आपल्याकडे अतिशय शुभ मानला जातो.दिवाळी पाडव्याचा शुभ मुहूर्त हा सकाळी ६ वाजून १४ मिनिट ते सायंकाळी ८ वाजून ३५ मिनिटांपर्यंत असणार आहे.
काय आहे दिवाळी पाडव्याचे महत्त्व?
पाडव्याच्या शुभ दिवशी आवर्जून सोने खरेदी केली जाते. पाडव्याला सूवासिनींकडून पतीचे औक्षण केले जाते. औक्षण केल्यावर पती पत्नीला भेटवस्तू देतात. या दिवशी व्यापारी त्यांच्या जमाखर्चाच्या वह्या, पेन इत्यादी अनेक वस्तूंची पूजा करतात. कारण व्यापाऱ्यांसाठी नवीन वर्षाचा प्रारंभ देखील पाडव्याच्या दिवसापासून केला जातो.
बलिप्रतिपदेची पूजा
दिवाळी पाडव्याच्या दिवशी बलिप्रतिपदेच्या पूजेला खास महत्व असतं. बलिप्रतिपदेतील बळी राजाची आजच्या दिवशी खास पूजा करण्यात येते. हा बळी राजा शेतकऱ्यांचा राजा होता. भगवान विष्णूच्या वामन अवताराने या बळी राजाकडून तीन पावले जमीन दान स्वरूपात मागून त्याला मारले होते. पंरतु, हा बळी राजा मनाने उदार होता. त्यामुळे, बलिप्रतिपदेच्या दिवशी त्यांची पूजा केली जाते. आज ही भावाला ओवाळताना त्यांच्या बहिणी आवर्जून म्हणतात की, ‘इडा पीडा टळो आणि बळीचे राज्य येवो’.
हे ही वाचा :
LALIT PATIL DRUGS: प्रज्ञाच्या जामिनासाठी वकिलांची कोर्टात धाव
जातीपातीच्या नावावर हे राज्य फोडण्याचं एक षडयंत्र सुरू, संजय राऊत