Thursday, November 30, 2023

Latest Posts

दिवाळीत अपघात किंवा आग लागल्यास,करा ‘हे’ काम,वाचा उपाय

देशभरात दिवाळी हा सण उत्साहात आणि आनंदात साजरा होत आहे.दिवाळीत घरी साफसफाईपासून फराळाची तयारी केली जाते. दिवे लावले जातात, फटाके फोडले जातात.

देशभरात दिवाळी हा सण उत्साहात आणि आनंदात साजरा होत आहे.दिवाळीत घरी साफसफाईपासून फराळाची तयारी केली जाते. दिवे लावले जातात, फटाके फोडले जातात.खरंतर, दिवाळीत फटाके फोडल्याशिवाय अनेकांना राहवत नाही,अनेकजण दिवाळीत फटाके फोडत असतात. मात्र, या फटाक्यांमुळे अनेक लोक अपघाताला बळी पडतात. फटाक्यांमुळे लोकांचे डोळे आणि हात-पाय भाजतात. त्यामुळे फटाके फोडताना विशेष काळजी घेण्याची गरज आहे. फटाके फोडताना कोणत्या गोष्टींची आणि कशी काळजी घ्यायची या संदर्भात काही खास टिप्स सांगणार आहोत.

 फटाके वाजवताना यागोष्टीची विशेष काळजी घ्या 

ज्यावेळी तुम्ही फटाके फोडता त्यावेळी एक भरलेल्या पाण्याची बादली किंवा थोडी वाळू जवळ ठेवा जेणेकरून फटाके वाजवताना चुकून आग लागली कोणतीही दुर्घटना घडली तर या गोष्टींमुळे ती लगेच टाळता येईल.

फटाके फोडताना सिंथेटिक आणि नायलॉनचे कपडे घालू नका.

फुटणारे फटाके जपून जाळून टाका आणि फटाके फोडताना हातात धरू नका.

फटाके पेटवल्यानंतर, उरलेले गरम लाकूड सुरक्षित ठिकाणी फेकून द्या जेणेकरून ते कोणाच्याही पायाखाली येणार नाहीत.

फटाके फोडताना लहान मुले तुमच्या बाजूला नसतील याची काळजी घ्या.

फटाक्यांनी पेट घेतल्यास सर्वात आधी हेकाम करा

फटाके पेटवताना चुकून हात पाय भाजले तर लगेच थंड पाण्यात बुडवा. जळजळ दूर होईपर्यंत हात पाण्यातच बुडवून ठेवा. घाईत चुकूनही बर्फ लावू नका. कारण त्यामुळे रक्त गोठण्याची शक्यता असते.

तुळशीच्या पानांचा रस

फटाके फोडताना तुमचा हात किंवा पाय थोडासाही भाजल्यास तुळशीच्या पानांचा रस जळलेल्या जागेवर लावावा. यामुळे जळजळ कमी होईल आणि कोणतेही जखम राहणार नाही. जखम खोल असेल तर तुळशीची पाने वापरणे टाळा.

खोबरेल तेल

जर कुठे जास्त जळत असेल तर खोबरेल तेलाचा वापर करा. कारण खोबरेल तेल थंड असतं. खोबरेल तेल लावल्याने जळजळ होण्यापासून खूप आराम मिळतो. आणि दागही राहत नाहीत.

बटाट्याचा रस

तुम्ही जळलेल्या भागावर बटाट्याचा रस देखील लावू शकता, त्याचा थंड प्रभाव असतो आणि यामुळे जळजळ शांत होते, ज्यामुळे खूप आराम मिळतो.

चुकूनही कापूस लावू नका

जळलेल्या जागेवर किंवा जखमेवर कापूस लावू नका. कारण ओल्या जखमेवर कापूस लावल्यास तो अडकतो आणि कापूस नंतर काढून टाकल्यास वेदना होतात.

हे ही वाचा : 

Diwali 2023, दिवाळी पाडवानिम्मित तुमच्या साथीदाराला द्या खास शुभेच्छा…

MAHARASHTRA: फटाक्यांच्या अतिवापरामुळे पुण्याची हवा बिघडली

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss