spot_img
spot_img

Latest Posts

हरतालिकेच्या पूजेचं महत्व, मुहूर्त आणि पूजा कशी करायची? जाणून घ्या

हरतालिका तृतीयेला हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे. गणेश चतुर्थीच्या आधीच्या दिवशी म्हणजे भाद्रपद शूद्र तृतीयेला हरतालिका असे म्हणतात.

हरतालिका तृतीयेला हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे. गणेश चतुर्थीच्या आधीच्या दिवशी म्हणजे भाद्रपद शूद्र तृतीयेला हरतालिका असे म्हणतात. या दिवशी भगवान शंकराने माता पार्वतीला पत्नी म्हणून स्वीकारले. विवाहित महिलांसाठी हे व्रत खूप महत्वाचे आहे. हरतालिकेच्या दिवशी स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करतात. हरतालिकेच्या व्रतामध्ये भगवान शिव आणि माता पार्वतीची विशेष पूजा केली जाते. हरतालिकेच्या व्रतामध्ये भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा केली जाते. हा उपवास विवाहित आणि अविवाहित स्त्रिया दोन्ही ठेवू शकतात. हरतालिका तृतीयाचे व्रत शंकर-पार्वतीला समर्पित आहे. पतीच्या दीर्घायुष्यासाठी, कुटुंबाची प्रगती आणि समृद्धीसाठी हे व्रत खूप महत्त्वाचे आहे, असे म्हटले जाते.

पौराणिक मान्यतेनुसार, देवी पार्वतीची कठोर तपश्चर्या पाहून भगवान शंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी देवी पार्वतीला दर्शन दिले. तेव्हा भगवान शंकराने तिला माता पार्वतीला पत्नी म्हणून स्वीकारले. तेव्हापासून जगभरातील अविवाहित मुली आणि विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि इच्छित वर मिळण्यासाठी दरवर्षी हरतालिकाचे व्रत करू लागल्या. हरतालिका तृतीयेच्या दिवशी फुलांनी बनवलेला फुलोरा बांधला जातो. त्याच्या खाली मातीचे शंकर आणि पार्वतीच्या मुर्तीची स्थापना केली जाते. या दिवशी रात्री जागरण करून शिव आणि पार्वतीची पूजा केली जाते. असे मानले जाते की, या पद्धतीने पूजा केल्याने विवाहित स्त्रीला नेहमी भाग्यवान राहण्याचा आशीर्वाद मिळतो, तसेच विवाहित मुलींना चांगला जोडीदार ही मिळतो.

हरतालिकेची पूजा कशी करायची?

हरतालिकेच्या दिवशी उपवास केल्याने आणि हरतालिकेची कथा ऐकल्याने माणसाच्या मनोकामना पूर्ण होतात. वैवाहिक जीवनात शांती राहते. या दिवशी स्त्रिया शिवाची सोळा अलंकारानी पूजा करतात. सुरुवातीला पिवळ्या कापडावर तीन मूर्ती किंवा वाळूचे शिवलिंग ठेवावे. त्यानंतर चौरंगावर उजव्या हातानी तांदळापासून अष्टकमल तयार करा आणि त्यावर कलश ठेवा. त्यानंतर कलश वर स्वस्तिक बनवा आणि कलशमध्ये पाणी भरा. त्यात सुपारी, नाणे आणि हळद घाला. मूर्तीचा विधीवत अभिषेक करा. त्यानंतर देवी पार्वतीला सौभाग्याच्या वस्तू ही अर्पण कराव्यात.

हरतालिका शुभ मुहूर्त –

भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाची तृतीया तिथी १७ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ११.०८ ते १८ सप्टेंबर २०२३ रोजी रात्री १२.३९ पर्यंत असेल. या दिवशी प्रदोष काल पूजेचा पहिला शुभ मुहूर्त संध्याकाळी ०६.२३ ते ०६.४७ पर्यंत आहे. ज्या महिला सकाळी हरितालिका तृतीयेचे व्रत करतात, त्यांच्यासाठी १८ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ०६.०७ ते ०८.३४ पर्यंत पूजेचा शुभ मुहूर्त आहे. हरतालिका तृतीयाची पूजा रात्रीच्या चार प्रहरातच करण्याची प्रथा आहे. हा उपवासाची सुरुवात सूर्योदयापासून सुरू होतो आणि दुसऱ्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी २४ तासांनी संपतो. या दिवशी काही महिला निर्जळी उपवास करतात.

हे ही वाचा: 

बैलपोळा सण का साजरा केला जातो? जाणून घ्या महत्व…

घरच्या घरी Healthy oats आणि Honey पासून बनवा टेस्टी कुकीज…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss