श्रीकृष्णांचा जन्म मध्यरात्री झाल्याने दोन दिवस त्यांचा जन्मोत्सव साजरा केला जातो. कृष्णाच्या मंदिरात रात्री १२ ला पाळणा गायला जातो. श्रीकृष्णाच्या जन्माचा जल्लोष खूप उत्साहाने केला जातो. दुसऱ्या दिवशी दहीहंडीचे नियोजन असते. श्रीकृष्णाना लहानपणापासून दही, लोणी खाण्याची खूप आवड होती. श्रीकृष्ण हे गावप्रमुखाचे पुत्र होते तरी घरी असलेले यशोदा मातेने बनवलेले लोणी त्यांना कमीच. त्यामुळे सवंगड्यांची गट्टी जमवून त्यांनी गोपिकांच्या घरचे ही लोणी ते पळवले. यासाठी ते एकमेकांच्या खांद्यावर चढून दह्याची हंडी फोडायचे.
श्रीकृष्णांना काय आवडतं असा विचार केला तर लोणी आणि दही यांचेच नाव मनात सुचते. पण, तुम्हाला माहितीय का बाळकृष्णांना दहीकाला ही खूप आवडतो. दहीकाला हा का बनवला जातो, त्याची कथा आणि तो कसा बनवायचा याची थोडक्यात माहिती घेऊया. रूक्मिणी माता श्रीकृष्णांवर रूसून जेव्हा पंढरपुरा जवळच्या दिंडीरी वनात आल्या. तेव्हा त्यांना मनवण्यासाठी कृष्णांनीही पंढरपुराची वाट धरली होती. येताना ते गोपाळ आणि गोमाता यांचा लवाजमा सोबत घेऊनच आले होते. जेव्हा श्रीकृष्णांनी माता रूक्मिणीं याना मनवले आणि त्या प्रसन्न झाल्या. तेव्हा श्रीकृष्णांनी उंच पर्वतावर मोठ्या उत्सवाचे आयोजन केले होते. त्यात सर्व भक्त आपापली शिदोरी घेऊन आले आणि याच एकत्र जेवणाच्या समारंभाला ‘काला’ असे म्हणतात.
‘गोपाल काला’ हा उत्सव पंढरपुरात वर्षातून दोन वेळा साजरा केला जातो. प्रथम जून-जुलै महिन्यातून आषाढी पौर्णिमेला आणि ऑक्टोबर-नोव्हेंबरमधील कार्तिकी पौर्णिमेला साजरा केला जातो. तनमनाने सारे भाविक एकत्र येतात. विठ्ठलनामाचा आणि गोपाळकृष्णाचा जयघोष करतात. दिंड्या पालख्या घेऊन वारकरी येथे एकत्र येतात. किर्तने करतात आणि काला खातात.आज ही जेव्हा येथे कथेचे वाचन केले जाते, तेव्हा पोहे आणि दही एकत्र करून एकमेकांवर टाकले जाते. गोपाळपुरात भक्तमंडळी वेगवेगळ्या ठिकाणी काल्याचा उत्सव साजरा करतात. दही- पोह्यांनी भरलेले माठ वृक्षांना लटकवून दहीहंडीसारखेच फोडतात.
देव ही मत्सांच्या रूपात खातात दही-काला
पंढरपुरमध्ये असलेली गोपाळपूरची टेकडी हाच गोवर्धन पर्वत असून तो चंद्रभागेच्या काठावर आहे. गोपाळपूर आणि विष्णुपद हे पंढरपूर क्षेत्राचे अविभाज्य घटक असून यात्रेकरूंसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण स्थळ आहेत. विष्णुपदी गोपाळकृष्ण गोपाळांसह नित्य भोजन करीत असतात. गोपाळपुरात गाई चरून पाणी पाजण्याकरिता चंद्रभागेवर आल्यानंतर गोपाळ आपाल्या शिदोऱ्या काढून भोजनाचा आनंद घेत असतात. त्यावेळी आपणास त्यातील उष्टा भाग मिळावा, म्हणून कित्येक देव मत्स्यांचे रूप धारण करून श्री चंद्रभागेच्या पात्रात काठावर पडलेले उच्छिष्ट भक्षण करतात, असा उल्लेखही पुराणांमध्ये आढळतो.
हे ही वाचा:
Janmashtami 2023, यंदाच्या जन्माअष्टमीनिम्मित जाणून घ्या तारीख, मुहूर्त आणि महत्व
Janmashtami 2023, गोकुळाष्टमीला आंबोळ्या बनवताना वापरा ‘या’ टिप्स