पावसाळा सुरु झाला की, अनेक जण श्रावण सुरु होण्याची आतुरतेने वाट बघत पाहतात. श्रावण महिना म्हणजे सण, समारंभ आणि उत्साहाचा महिना. श्रावण हा महिना महादेवाच्या भक्तासाठी महत्वाचा आहे. तसेच तो कृष्ण भक्तीसाठीही पवित्र महिना आहे. कारण या महिन्यात ज्या एका कार्यक्रमाची वाट पाहतात तो कृष्ण जन्माष्टमी हा सण येतो.
श्रीकृष्णाच्या जन्माच्या वेळीही त्याच्यावर अनेक हल्ले झाले होते. पण साक्षात श्री विष्णूचे अवतार असलेल्या भगवान कृष्णची लिला अगाध होती. त्यांनी वेळोवेळी दानवांचा संहार केला. मथुरेच्या राजकन्या देवकी आणि वासुदेव याचा आठवा अपत्य म्हणून जन्मलेला कान्हाचे बाळपण गोकुळात माता यशोदेच्या कुशीत गेले. वासुदेवानी कान्हाला राजा कंसापासून वाचवण्यासाठी त्याच्या जन्मानंतर लगेच त्याचे चुलत भाऊ नंदबाबा आणि यशोदा यांना दिले होते. श्रीकृष्णांनी आपल्या जन्मापासून अनेक चमत्कार दाखवले. तर या कृष्ण जन्माष्टमीला जाणून घेऊया कृष्णजन्माष्टमी चा इतिहास आणि महत्व.
भाद्रपदाच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला कारागृहात भाऊ कंसाचा अत्याचार सहन करणाऱ्या देवकीने आठवे अपत्य म्हणून श्रीकृष्णाला जन्म दिला. अशी हिंदू धर्मात श्रद्धा आहे. कंसाच्या अत्याचाराला आणि दहशतीपासून जगाला मुक्त करण्यापासून भगवान विष्णू पृथ्वीवर अवतरले. या आख्यायिकेनुसार दरवर्षी भाद्रपद अष्टमीला कृष्ण जन्माष्टमी उत्सव साजरा केला जातो. पुराणानुसार, श्रीकृष्ण भगवान विष्णूचा अवतार आहेत, जे त्रिमूर्तीपैकी एक आहेत. दरवर्षी लोक कृष्ण जन्माष्टमीला कृष्णाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी उपवास करतात आणि मध्यरात्री विधीपूर्वक पूजा करतात. या दिवसात मंदिरे विशेष सजवलेली जातात.
भगवान श्रीकृष्णाची विशेष पूजा केली जाते. श्रीकृष्णाचा जन्म मध्यरात्री झाला. त्यामुळे जन्माष्टमीच्या मध्यरात्री देवघरात असलेल्या बाळकृष्णाच्या मूर्तीची पूजा केली जाते. तिला अभिषेक घालून फुले अर्पण केली जातात आणि धूप दिवे लावून पूजा केली जाते. कान्हाला आवडीचे पदार्थ अर्पण केले जातात. देवाला नैवेद्य दाखल्यानंतर सर्वाना प्रसाद वाटला जातो. अनेक ठिकाणी जन्माष्टमीच्या दिवशी दहीहंडीचे आयोजन केले जाते. विशेषतः गुजरात आणि महाराष्टात त्याचे विशेष महत्व आहे.
दहीहंडीचा इतिहास खूप रंजक आहे. कान्हा लहानपणी खूप खोडकर होते. कान्हाला दही आणि लोणी खूप आवडचे. त्याला लोणी आणि दही इतके आवडायचे की, तो त्याच्या मित्रांसोबत गावातील लोकांच्या घरातून लोणी चोरून खात असे. कान्हापासून लोणी वाचवण्यासाठी स्त्रिया लोणीचे भांडे उंचावर टांगत असत. पण बालगोपाळ आपल्या मित्रासह एकमेकांच्या खांद्यावर चढुन दहीहंडी फोडत असे. हाच खेळ दहीहंडी उत्सव म्हणून प्रसिद्ध आहे. या थर लावणाऱ्याला आणि स्पर्धा जिकणाऱ्यानां लाखो रुपयांची बक्षिसे दिली जातात.
हे ही वाचा:
Asia Cup 2023 IND vs PAK, शाहिन आफ्रिदीने विराट-रोहित दोघांनाही केले बाद, भारताची खराब सुरुवात…
जालना आंदोलनावर शरद पवार आणि उदयनराजे भोसले यांची प्रतिक्रिया…