Friday, December 1, 2023

Latest Posts

Diwali 2023:जाणून घ्या दिवाळीत केल्या जाणाऱ्या अभ्यंगस्नानाचे फायदे

जाणून घ्या दिवाळीत केल्या जाणाऱ्या अभ्यंगस्नानाचे फायदे

दिवाळीच्या दिवसात अभ्यंग स्नानाला खूप महत्त्व देण्यात आले आहे. यावर्षी नरक चतुर्दशी १२ नोव्हेंबर २०२३ रोजी साजरी केली जाईल. हिंदू धर्मात नरक चतुर्दशीच्या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त आहे. या दिवशी यमराज आणि श्रीकृष्णाची विशेष पूजा केली जाते आणि सुख, समृद्धी आणि अकाली मृत्यूपासून संरक्षणासाठी यादिवशी कामना केली जाते. नरक चतुर्दशीला अभ्यंग स्नान करण्याचे विशेष महत्त्व आहे. स्नान करण्याची अनोखी परंपरा आहे. या स्नानाला पहिली अंघोळ असं देखील म्हटले जातं. यावर्षी अभ्यंग स्नानाचा मुहूर्त सकाळी ५:२८ ते सकाळी ६:४१ पर्यंत सांगण्यात आला आहे. चला तर मग जाणून घेऊया नरक चतुर्दशीला अभ्यंग स्नान का आणि कसे केले जाते आणि त्याचे विशेष महत्त्व काय आहे.

​अभ्यंगस्नानाचे महत्त्व

धार्मिक शास्त्रानुसार नरक चतुर्दशीला सूर्योदयापूर्वी अंगाला मुलतानी माती लावून स्नान करण्याच्या प्रक्रियेला अभ्यंगस्नान असं म्हणतात. ज्यामध्ये हळद, दही, तिळाचे तेल, बेसन, चंदन आणि औषधी वनस्पती या लावल्या जातात. या पेस्टने संपूर्ण शरीराची नीट मालिश केली जाते. या उटणामुळे त्वचेची पोत सुधारण्यात देखील मदत होते.

याचा कोणताही दुष्परिणाम नाही

जेव्हा तुम्ही केमिकलयुक्त क्रीम chemical cream आणि उत्पादने वापरता, तेव्हा दुष्परिणाम आणि तुमच्या त्वचेचे नुकसान होण्याची भीती नेहमीच सतावत असते. बर्‍याच वेळा, ही उत्पादने त्वरित चमक देतात, परंतु भविष्यात यामुळे हानी देखील होऊ शकतात. त्याच वेळी, मुलतानी माती सनी उटणे नैसर्गिक घटकांपासून बनवलेले आहे, ज्याचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत त्यामुळे उटण्याचा वापर करून तुम्ही सुंदर त्वचा मिळवू शकता.

हायपर-पिग्मेंटेशन hyper-pigmentation आणि असमान टोनपासून मुक्त व्हा

जवळजवळ प्रत्येकाला हायपर-पिग्मेंटेशन hyper-pigmentation आणि असमान त्वचा टोनची तक्रार असते. आणि ते लपवण्यासाठी रोज मेकअप वापरणे देखील योग्य नाही. उटणे वापरणे आणि नैसर्गिक मार्गाने या समस्यांपासून मुक्त होणे नेहमीच चांगले आहे.

त्वचा ताजी आणि मऊ होते

उष्ण हवामानामुळे आपली त्वचा कोरडी पडते आणि त्याचा परिणाम सर्वप्रथम चेहऱ्यावर दिसून येतो. तुम्ही तुमच्या उटण्यामध्ये गुलाबाच्या पाकळ्या, केशर आणि संत्र्याच्या सालीची पावडर देखील मिक्स करू शकता ज्यामुळे तुमची त्वचा मऊ आणि ताजी टवटवीत राहते.

हे ही वाचा : 

गडकरींना धमकी देणाऱ्या जयेश पुजारीचा खळबळजनक दावा

दिवाळी सणाला किल्ला ‘का’ बनवतात?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss