कृष्ण जन्माष्टमीला जन्माष्टमी किंवा गोकुळाष्टमी असेही म्हणतात. हा वार्षिक हिंदू सण आहे. श्रावण महिन्यात कृष्णअष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदिशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला. म्हणून त्या दिवशी आनंदोत्सव साजरा केला जातो. हिंदू धर्मातील विशेषतः वैष्णव पंथातील एक महत्त्वाचा सण आहे. भागवत पुराणानुसार कृष्णाच्या जीवनावर आधारित नृत्य-नाटक (जसे की रस लीला किंवा कृष्णलीला), मध्यरात्री भक्तीगीत गायन, उपवास, पूजा, जागरण आणि पुढील दिवशी महोत्सव यांचा जन्माष्टमी उत्सवामध्ये समावेश होतो. कृष्ण जन्माष्टमीनंतर नंदोत्सव हा सण साजरा केला जातो. नंदाने कृष्णाच्या जन्माच्या सन्मानार्थ लोकांना भेटवस्तू वितरित केल्या होत्या, त्याचा हा सण असतो.
जन्माष्टमीचे महत्व –
कृष्णाचा जन्म दिवस श्रावण महिन्यात वैद्य अष्टमीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदीशाळेत झाला. म्हणून त्या दिवशी कृष्ण जन्मउत्सव साजरा करण्याची प्रथा आहे. अष्टमीच्या दिवशी काही लोक व्रत सुद्धा करतात या दिवशी एकभुक्त राहून पांढर्या तिळाचा कल्प अंगाला लावून स्नान करतात. व्रताचा संकल्प करून देवघर फुलं, पाखळ्यांनी सुशोभित करतात व त्या स्थानी देवकीचे सुतीकारागृह स्थापन करतात. कृष्णजन्माच्या वेळी मंचकावर देवकी आणि कृष्ण यांच्या मूर्तीची स्थापना करतात व बाजूला यशोदा व तिची नवजात कन्या, वसुदेव नंद यांच्या मूर्ती बसवतात.सप्तमीच्या मध्यरात्री शुचिर्भूत होऊन संकल्प करतात व सहपरिवार कृष्णाची पूजा करतात. अष्टमीच्या दिवशी देवालाही फराळ, नैवेद्य दाखवतात.यामध्ये काला म्हणजे एकत्र मिळवणे. पोहे, ज्वारीच्या लाह्या, लिंबू व आंब्याचे लोणचे, दही, भिजवलेली डाळ, साखर, फळांच्या फोडी इत्यादी घालून केलेला एक खाद्यपदार्थ असतो.कृष्णा हा फार प्रिय होता. असे मानले जाते, की श्रीकृष्ण व त्यांचे प्रिय सवंगडी मिळून यमुनेच्या तीरावर काला तयार करत असत व वाटून खात असत. कोकणात व महाराष्ट्रात उत्सवा निमित्त दहिकाला होतो. या ठिकाणी ही हंड्या फोडत, काही ठिकाणी गोपाळकाला म्हणून साजरा केला जातो. गोकुळाष्टमीचे एक व्रत म्हणून देखील सांगितले असून ते केल्याने संतती, संपत्ती व वैकुंठ लोक यांची प्राप्ती होते. असे महत्त्व आपल्याला दिसून येते.
कृष्ण जन्माष्टमी २०२३ तारीख आणि मुहूर्त –
६ सप्टेंबर २०२३ , बुधवारी, जन्माष्टमीची पूजा रात्री ११.५७ ते १२.४२ या वेळेत होईल. कान्हाचा जन्म मध्यरात्री रोहिणी नक्षत्रात झाला होता. ६ सप्टेंबर रोजी सकाळी ०९:२० पासून रोहिणी नक्षत्र सुरू होत आहे. दुसऱ्या दिवशी ७ सप्टेंबर रोजी सकाळी १०.२५ वाजता संपेल. दुसरीकडे, जन्माष्टमी उपवास ७ सप्टेंबर रोजी सकाळी ०६.०२ नंतर किंवा ०४.१४ नंतर साजरा केला जाऊ शकतो.
हे ही वाचा:
कृष्णजन्माष्टमीला करा या पाच गोष्टींचा वापर
Janmashtami 2023, गोकुळाष्टमीला आंबोळ्या बनवताना वापरा ‘या’ टिप्स