नवरात्रोत्सव आणि दसऱ्याची सांगता झाल्यानंतर सगळ्यांना वेध लागते ते कोजागिरी पोर्णिमेचं आपल्या संपूर्ण देशात कोजागिरी पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. या कोजागिरी निमित्त अनेक ठिकाणी कार्यक्रम आयोजित केले जातात. वर्षातील सर्वात मोठी पौर्णिमा म्हणून कोजागिरी पौर्णिमा ही ओळखली जाते. या वर्षी कोजागिरी पौर्णिमा शनिवार २८ ऑकटोबरला साजरी केली जाणार आहे. या दिवशी चंद्राचे साजरे रूप आणि टपोरे चांदणं पहायला मिळते. या दिवशी चंद्राचे सर्वाधिक सुंदर आणि साजिरे रूप दिसते असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. या लेखात आपण जाणून घेणार आहोत कोजागिरी पौर्णिमेचे महत्त्व आणि मुहूर्त.
कधी आहे कोजागिरी पौर्णिमेचा मुहूर्त?
अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील येणाऱ्या पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा किंवा शरद पौर्णिमा असे म्हटले जाते. २८ ऑक्टोबरला पहाटे 4 वाजून १७ मिनिटांनी कोजागिरी पौर्णिमेला सुरुवात होणार आहे. ही पौर्णिमा रविवार २९ ऑक्टोबरला सकाळी १ वाजून ५३ मिनिटांनी संपेल.परंतु, पौर्णिमेच्या चंद्रोदयाची वेळ आणि उदय तिथी दोन्ही २८ ऑक्टोबरला म्हणजेच शनिवारी येत असल्यामुळे कोजागिरी पौर्णिमा २८ ऑक्टोबरला शनिवारी साजरी करण्यात येईल. कोजागिरी पौर्णिमेला चंद्रोदयाची वेळ ही संध्याकाळी ५ वाजून २० मिनिटांनी म्हणजेच २८ ऑक्टोबरला शनिवारी सुरू होणार आहे.
कोजागिरी पौर्णिमेला लक्षमी पूजनाचा मुहूर्त कधी?
कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री लक्ष्मीचे पूजन आणि अराधना केली जाते.लक्ष्मी देवीची पूजा करण्यासाठी एकूण ३ मुहूर्त आहेत. या तीन मुहूर्तांपैकी पहिला मुहूर्त हा रात्री ८:५२ ते १०:२९ पर्यंत आहे. त्यानंतरचा दुसरा मुहूर्त हा रात्री १०:२९ पासून ते १२:०५ पर्यंत आहे, त्यानंतर तिसरा मुहूर्त हा मध्यरात्री १२:०५ पासून ते १:४१ पर्यंतचा आहे. या ३ मुहूर्तांपैकी कोणत्याही एका मुहूर्तावर तुम्ही देवीची पूजा करू शकता. पूजा झाल्यानंतर लक्षमी देवीला दुधाचा किंवा खिरीचा प्रसाद दिला जातो, हे दूध किंवा खीर पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशात ठेवला जातो आणि नंतर त्याचं सेवन केलं जातं .