Mahashivratri 2025: ‘महाशिवरात्री’ ही शिवभक्तांच्या दृष्टीने अत्यंत पवित्र असे सूत्र मानले जाते. या दिवशी शंकर देवाची पूजा केली असता सर्व पापांचा नाश होऊन शिवलोकाची प्राप्ती होते. माघ वद्य चतुर्दशीची रात्र ही महाशिवरात्री म्हणून ओळखली जाते. हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचा आणि पवित्र सणांपैकी एक महत्त्वाचा सण म्हणजे महाशिवरात्री. प्रत्येक वर्षी फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीला महाशिवरात्री साजरी केली जाते. महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगाची पूजा, उपवास, रात्रीचे जागरण आणि महामृत्युंजय मंत्राचा जप करण्याची परंपरा आहे. पौराणिक कथेनुसार भगवान शिव आणि माता पार्वतीचा विवाह महाशिवरात्रीच्या दिवशी झाला होता. त्यामुळे हा दिवस अत्यंत शुभ आणि फलदायी मानला जातो. वैदिक पंचागानुसार यावर्षी २६ फेब्रुवारीला महाशिवरात्री व्रत पाळण्यात येणार असून या दिवशी अनेक शुभ संयोगही घडणार आहेत. ज्याचा फायदा या राशींना होणार आहे. जाणून घ्या कोणत्या आहेत त्या राशी?
‘या’ ४ राशींना मिळणार लाभ
यंदाच्या वर्षी म्हणजे २०२५ ची महाशिवरात्र ही २६ फेब्रुवारीला साजरी करण्यात येणार आहे. हा दिवस भगवान शिवाला समर्पित केला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार, महाशिवरात्रीच्या दिवशी असा एक शुभ संयोग घडणार आहे, ज्यामुळे ५ राशीच्या लोकांचे नशीब पलटणार आहे.
मिथुन –
मिथुन राशीच्या लोकांच्या नवव्या घरात कुंभ राशी असल्यामुळे मिथुन राशीच्या लोकांच्या घरात चार शुभ संयोग प्राप्त होणार आहेत. यामुळे मिथुन राशीचे नशीब बदलणार आहे. आर्थिक लाभासोबतच मिथुन राशीच्या लोकांना करिअरमध्येही प्रगती मिळणार आहे. त्याचबरोबर कोणत्याची प्रवासात फायदा होण्याची शक्यता आहे.
तूळ –
तूळ राशीच्या पाचव्या घरात शुभ संयोग तयार होणार आहे. तूळ राशीच्या लोकांना नवीन संधीची प्राप्ती होणार असून प्रेमसंबंधांमध्येही सुधारणा दिसून येणार आहे. त्याचबरोबर शैक्षणिक क्षेत्रात यश मिळण्याची शक्यता आहे.
वृश्चिक –
वृश्चिक राशीच्या लोकांच्या चौथ्या घरात हा संयोग तयार होईल. याद्वारे तुम्हाला नवीन वाहन, घर किंवा मालमत्तेशी संबंधित लाभ मिळू शकतात. या काळात तुम्हाला मानसिक शांती आणि तुमच्या कौटुंबिक जीवनात सुधारणा दिसून येईल.
कुंभ –
महाशिवरात्रीच्या दिवशी कुंभ राशीचे नशीब चांगलेच झळकणार आहे. कुंभ राशीचे लोक यावेळी आत्मविश्वासाने परिपूर्ण असणार आहेत. या लोकांना नेतृत्व आणि नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. या काळात कुंभ राशीच्या लोकांना करियरमध्ये मोठी संधी उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर समाजात प्रतिष्ठा मिळणार असून महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी हा काळ अनुकूल आहे.