Mahashivratri 2025 : हिंदू धर्मामध्ये महाशिवरात्र एक अत्यंत महत्त्वाचा आणि लोकप्रिय सण आहे. या दिवशी भगवान शिव यांची उपासना केली जाते, आणि तो दिवस विशेषत: श्रद्धेने व भक्तिभावाने साजरा केला जातो. महाशिवरात्री हा सण फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीला ही शिवरात्र येते. महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवाचे पूजन, उपवासी व्रत, रात्रभर जागरण आणि मंत्रोच्चार यांचे आयोजन केले जाते. शिवरात्री म्हणजे “शिवाची रात्र”. रात्रभर पूजा करून, भक्त भोळ्या भगवान शिवाच्या कृपेची प्राप्ती करण्याचा प्रयत्न करतात. यंदाची महाशिवरात्री खूप खास आहे. यंदा महाकुंभ आणि महाशिवरात्रीचा एकत्र विशेष संयोग पाहायला मिळणार आहे.
यंदाची महाशिवरात्र ठरणार खास
यावर्षी फाल्गुन महिनेच्या कृष्ण पक्षाची चतुर्दशी तिथी २६ फेब्रुवारी रोजी सकाळी ११:०८ वाजता सुरु होईल. ही तारीख २७ फेब्रुवारी रोजी सकाळी ८:५४ वाजता संपेल. अशा स्थितीत महाशिवरात्रीचा सण २६ फेब्रुवारी रोजी साजरा केला जाईल. त्याचबरोबर या दिवशी उपासना देखील केली जाऊ शकते. यावेळी महाशिवरात्रीच्या दिवशी प्रयागराजच्या महाकुंभात शाही स्नानाचा एक विशेष योगायोग निर्माण होत आहे. यामुळे महाशिवरात्रीचा उत्सव अनेक पटींनी अधिक महत्वाचा बनणार आहे.
महाशिवरात्रीतले पूजेचे रात्रीचे मुहूर्त कोणते ?
रात्रीचा पहिला मुहूर्त – संध्याकाळी ६.१९ ते ९.२६ पर्यंत असेल.
रात्रीचा दुसरा मुहूर्त – २६ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.०९ ते २७ फेब्रुवारी रोजी १२.३४ पर्यंत.
रात्रीचा तिसरा मुहूर्त – २७ फेब्रुवारी रोजी दुपारी १२.३४ ते ३.४१ पर्यंत असेल.
रात्रीचा चौथा मुहूर्त – २७ फेब्रुवारी सकाळी ३.४१ ते ६.४८ पर्यंत असेल.