Mahashivratri 2025 : महाशिवरात्री ही शिवभक्तांच्या द्रुष्टीने अत्यंत पवित्र असे सूत्र मानले जाते. या दिवशी शंकर देवाची पूजा केली असता सर्व पापांचा नाश होऊन शिवलोकाची प्राप्ती होते. माघ वद्य चतुर्दशीची रात्र ही महाशिवरात्री म्हणून ओळखली जाते.हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचा आणि पवित्र सणांपैकी एक महत्त्वाचा सण म्हणजे महाशिवरात्री. प्रत्येक वर्षी फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीला महाशिवरात्री साजरी केली जाते. महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगाची पूजा, उपवास, रात्रीचे जागरण आणि महामृत्युंजय मंत्राचा जप करण्याची परंपरा आहे. अनेक भक्त या दिवशी व्रत ठेवून व्रतपालन करतात आणि भगवान शिव यांची आराधना करून आपले पाप नष्ट करण्याची प्रार्थना करतात. पण तुम्हाला माहित आहे का भगवान शंकराची पूजा करताना बेलपत्राचा वापर का केला जातो?
पौराणिक कथेनुसार बिल्वपत्राची कथा सांगण्यात येते. त्या कथेनुसार समुद्र मंथनावेळी पृथ्वीवर विष उत्पन्न झाले होते. या विषामुळे भूमीवरील जीव-जंतू मृत्यू होत होता. यामुळे पृथ्वीवर मोठे संकट निर्माण झाले होते.समुद्र मंथनातून उत्पन्न झालेले विष शंकराने प्राशन केल्यामुळे शंकराचा कंठ निळा पडला. यामुळेच शंकराला नीळकंठ या नावाने ओळखले जाऊ लागले. मात्र, विषाच्या प्रभावामुळे शंकराचे डोके अत्यंत गरम झाले. त्यामुळे शंकराच्या शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊ लागली. शंकराची ही अवस्था पाहून अन्य देव त्यांच्या मदतीसाठी पुढे आले. तेव्हा त्यांच्या डोक्यावर बिल्वपत्र म्हणजेच बेलाची पाने ठेवून, शंकरावर पाण्याचा अभिषेक करण्यात आला. यामुळे शंकराचे डोके शांत झाले. बेलाची पाने थंड असतात आणि शरीरातील पाण्याची पातळी संयमित ठेवण्यास मदत होते. म्हणून भगवान शिवाची पूजा करत असताना बेलाच्या पानांचा सर्वाधित वापर केला जातो.
महाशिवरात्री का साजरी केली जाते?
महाशिवरात्री ही शिवभक्तांच्या द्रुष्टीने अत्यंत पवित्र असे सूत्र मानले जाते. या दिवशी शंकर देवाची पूजा केली असता सर्व पापांचा नाश होऊन शिवलोकाची प्राप्ती होते. माघ वद्य चतुर्दशीची रात्र ही महाशिवरात्री म्हणून ओळखली जाते. ही चतुर्दशी दोन दिवसात विभागलेली आहे तर ज्या मध्यरात्री चतुर्दशी येत असेल ती शिवरात्र मानली जाते. देशभरात सर्वत्र मोठ्या उत्साहात महाशिवरात्र साजरी केली जाते.