Monday, November 20, 2023

Latest Posts

Diwali 2023: दिवाळीच्या फराळासाठी बनवा खुसखुशीत शंकरपाळ्या

दिवाळीच्या फराळासाठी बनवा खुसखुशीत शंकरपाळ्या

यंदाची दिवाळी अगदी काहीच दिवसांवर येऊन ठेपली आहे, दिवाळी म्हटलं की पहिली आठवणारी गोष्ट म्हणजे दिवाळीचा फराळ. फराळाशिवाय दिवाळी होऊच शकत नाही कारण फराळाशिवाय दिवाळी अपूर्णच. घराघरांमध्ये आता दिवाळीच्या फराळाची लगबग सुरु झालेली आहे. घरातील महिलांनी एक एक फराळाचे पदार्थ बनवायला सुरुवात केली असून आज आम्हीही तुमच्यासाठी एक असाच फराळाचा खास पदार्थ घेऊन आलो आहोत ते म्हणजे ‘ खुसखुशीत शंकरपाळ्या’. चला तर मग जाणून घेऊयात खुसखुशीत शंकरपाळ्या बनवण्यासाठी लागणारं साहित्य आणि रेसिपी.

शंकरपाळी बनवण्यासाठी लागणारं साहित्य

४ कप मैदा,१ कप दूध,१ कप पिठी साखरकिंवा चवीनुसार ,३/४ कप तूप,मीठ चवीनुसार ,तळण्यासाठी तेल

शंकरपाळी रेसिपी-

सुरुवातीला मैदा चांगला चाळून घ्या त्यानंतर एका परातीत मैदा घ्यावा. त्यानंतर एका भांड्यात साखर घ्यावी आणि त्यात दूध टाकावे,त्या दुधात साखर विरघळेपर्यंत दूध गरम करत ठेवावं आणि गॅस बंद करावा. एका पॅनमध्ये तूप टाकून ते चांगलं गरम करून घ्यावं. आता हे गरम झालेलं तूप मैद्यामध्ये ओतावे.आता हे तयार झालेलं मोहन मैद्याला चांगल्या तऱ्हेने चाळून घ्यावे. म्हणजे त्याचीचांगली मूठ तयार झाली पाहिजे.आता यामध्ये दूध आणि साखरेची जे मिश्रण तयार केले आहे ते थोडे थोडे टाकून त्याचा चांगला गोळा बनवावा. बनवलेला गोळा कडक व्हायला हवा याची काळजी घ्यावी. साखरेचे मिश्रण कमी किंवा जास्त लागू शकते. आता हा बनवलेला गोळा पंधरा-वीस मिनिटं ओल्या कपडाने झाकून नीट बाजूला ठेवा.१५-२० मिनिटांनी पुन्हा एकदा मैद्याचा गोळा छान मळून घ्यावा. त्यातील एक मोठा गोळा घ्यावा व त्याची जाड पोळी लाटावी, त्याच्या कडा तुटलेल्या असल्या तरी चालतील. त्यानंतर शंकरपाळे कापणीच्या साह्याने किंवा सुरीने आपल्याला पाहिजे त्या आकारात शंकरपाळे कापून घ्यावे. अशाप्रकारे सर्व शंकरपाळे एक एक करत नीट तयार करून घ्यावे.त्यांनतर एका बाजूला कढईत तेल गरम करण्यासाठी ठेवावे. मध्यम आचेवर गॅस ठेऊन सर्व शंकरपाळे थोडे थोडे टाकून सोनेरी रंगावर तळून घ्यावे. मस्त खुसखुशीत गोड शंकरपाळी तयार.

हे ही वाचा : 

कार्तिकी एकादशीला उपमुख्यमंत्र्यांना निमंत्रण देणार नाही, मंदिर समितीचा निर्णय

लोकसभा निवडणुकीसाठी मनसेने कंबर कसली, राज ठाकरे यांच्या विदर्भात सभा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss