Friday, December 1, 2023

Latest Posts

दिवाळीसाठी बनवा चटपटीत चिवड्याची सोपी रेसिपी

दिवाळीसाठी बनवा चटपटीत चिवड्याची सोपी रेसिपी

दिवाळीसाठीचा फराळ करणार नाही असं एकही घर आपल्याला सापडणार नाही. दिवाळीच्या फराळाचे अनेक पदार्थ बाहेरून आणले जात असतील,पण चिवडा मात्र घरीच बनवला जातो. चिवडा बनवण्यासाठी सोपा आणि खायला कुरकुरीत चिवडा प्रत्येकालाच आवडतो. काहीजण पोह्याचा चिवडा करतात काही जण दगडी पोह्यांचा तर काहीजण मक्याचा. पण मक्याचा चिवडा बनवला तर तो कधी आकसतो तर कधी मऊ पडून जातो. पण आम्ही आज तुम्हाला परफेक्ट मक्याचा चिवडा करण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत.

मक्याचा चिवडा करण्याची सोपी रेसिपी या ५ स्टेप्स मध्ये-

१) सगळ्यात आधी एक कढईत तेल गरम करून घ्या नंतर त्यात शेंगदाणे तळून घ्या. तुम्ही शेंगदाणे जास्त तेलात न तळता हलके रोस्टकरून घ्या, दुसरीकडे हिरव्या मिरच्या बारीक चिरून घ्या आणि सोबत कढीपत्त्याची पानं घ्या त्यांनतर खोबऱ्याचे पातळ काप करून घ्या आणि खारट असलेली बुंदीसुद्धा घ्या, ही बुंदी तुम्हाला बाजारात कुठेही मिळेल.

२) पुढची स्टेप असेल चिवड्याचा मसाला, हा मसाला तयार करण्यासाठी एक चमचा काश्मिरील लाल तिखट, १ चमचा चाट मसाला,१ चमचा आमचूर पावडर, १ चमचा धणे पावडर, १ चमचा मीठ किंवा (तुमच्या चवीनुसार), १ चमचा हळद एकत्र करून ठेवून द्या. शेंगदाणे कुरकरीत झाले की त्यात १ चमचा हा मसाला घालून चांगलं एकजीव करा.

३)यानंतर गरम तेलात मक्याचे फ्लेक्स नीट तळून घ्या. मग एका जाळीच्या चमच्याने फ्लेक्स काढून घ्या, जेणेकरून त्यातलं एक्स्ट्रा तेल त्यात निघून जाईल. गरमागरम मक्याचे पोहे भाजून एका गाळणीत ठेवा, त्यात चमचाभर मसाला घालून एकजीव करून घ्या.

४) त्याच तेलात खोबऱ्याचे काप नीट तळून घ्या. खोबऱ्याचे काप लाल झाले की लगेच बाहेर काढा नाहीतर ते करपण्याची शक्यता असते. तळलेल्या मक्याच्या चिवड्यात खोबऱ्याचे काप, तळलेले शेंगदाणे आणि खारट बूंदी मिसळून घ्या. आवडीनुसार तुम्ही यात बारीक शेव, जाड शेव, गाठीया किंवा आवडीचे फरसाण घालू शकता.

५)आता कढईत ३ ते ४ चमचे तेल घालून २ चमचे बडीशेप, १ चमचा बारीक चिरलेली हिरवी मिरची, १ चमचा धणे, आणि कढीपत्ते घालून परतून घ्या. मक्याच्या चिवड्यात १०० ग्राम पिठीसाखर घालून चमच्याच्या साहाय्याने मिक्स करा, मग त्यात परतून घेतलेले सगळे पदार्थ घाला आणि हाताने व्यवस्थितरित्या एकजीव करा. तयार झाला कुरकुरीत, खमंग मक्याचा चिवडा.

हे ही वाचा : 

दिवाळीत एकादा मॉडर्न लूक हवा आहे,तर साडी नेसल्यावर ट्राय करा फ्रिल वर्क ब्लाऊज

पवारांच मुख्यमंत्री होण्याची स्वप्न पुढच्या काळातच – दीपक केसरकर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss