Friday, December 1, 2023

Latest Posts

दिवाळीच्या फराळासाठी बनवा पौष्टिक ‘कडबोळी’

दिवाळीच्या फराळासाठी बनवा पौष्टिक 'कडबोळी'

दिवाळीच्या फराळातील सर्वात पौष्टिक पदार्थ जर कोणता असेल तर आपल्याला सांगता येणार नाही कारण सगळेच पदार्थ मसालेदार आणि तेलकट असतात,जिभेच्या चवीसाठी ठीक आहे पण आरोग्याला त्याचा खास असा काही फायदा नाही. पण आपल्या फराळामधून नामशेष होत चाललेला एक आरोग्यदायी पदार्थ म्हणजे जो आरोग्यासाठी फार उपयुक्त आहे तो पदार्थ म्हणजे ‘कडबोळी’. कडबोळी हा एक पारंपरिक पदार्थ असून अनेक धान्यांपासून हा पदार्थ बनवला जातो. एकावेळी आपल्या पोटात अनेक धान्य पोटात जातात जे हिवाळा,पावसाळ्यातील वातावरणात आपल्याला पौष्टिक पदार्थ खावे लागतात. त्यावेळी कडबोळी हा पदार्थ तुमच्या शरीरात उष्णता निर्माण करतो.याची चव देखील चटपटीत असते आणि हा पदार्थ हातावर वळवून तयार केला जातो, अगदी चकलीसारखीच चव असलेली कडबोळी अनेकांची फेव्हरेट असते. ही कडबोळी नेमकी कशी बनवायची आणि यासाठीचं लागणारं साहित्य काय याबद्दल आपण आज जाणून घेऊयात

कडबोळी बनवण्यासाठी लागणारं साहित्य-

२ फुलपात्री भरून थालीपीठ भाजणी, २ चमचे तीळ, टे.स्पून चमचे तिखट, १ टे.स्पून चमचा मीठ, १ टे.स्पून ओवा आणि तळण्याकरिता ४ टे. स्पून कडकडीत तेल

कडबोळी बनवण्याची कृती-

एका पातेल्यात २ फुलपात्री भरून थालीपीठ भाजणी घ्यावी मग त्यात तीळ, तिखट, ओवा, चवीनुसार मीठ घालावे. सर्व नीट एकजीव करून मिसळावे व १ फुलपात्र भरून पाणी उकळून भाजणीवर घालावे व मिसळून एक तास झाकून ठेवावे. एक तासाने भाजणी हाताला पाणी लावून नीट मळून घ्यावी, त्यानंतर थोडीशी भाजणी पोळपाटावर घेऊन बोटाने वातीसारखी लांब वाळवावी. साधारण २ इंचाएवढी लांब नळी बनली की त्या नळीची दोन्ही टोकं एकत्र दाबून कडबोळं तयार करावे. पसरट कढईत तेल तापवावे त्यासाठी आच मंद करावी व वरीलप्रमाणे जेवढे कडबोळे तयार होतील त्यांना तेलात घालून मंद आचेवर काळपट रंगावर खमंग तळावीत. कडबोळी मऊ किंवा कच्ची ठेवू नयेत. वरील साहित्यात अंदाजे अर्धा किलो कडबोळी तयार होतात.

हे ही वाचा : 

रॅपर बादशाहची सायबर सेलकडून चौकशी; नेमकं प्रकरण काय?

AMAZON ची कमाई कशी होते? काय आहे इतिहास?| History of Amazon, How does Amazon Earn Money

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .

Latest Posts

Don't Miss