Ganeshotsav 2023 : मुंबई, पुण्यासह आता सगळीकडे गणेशउत्सवाची जोरदार तयारी सुरु झाली आहे. पुण्यातील सुप्रसिद्ध मानाचे पाच गणपती पाहण्यासाठी सगळेच उत्सुक असतात. त्यांना केलेली आरास, डेकोरेशन सगळ्यांनाच आवडते. पण आता महानगरपालिकेकडून गणेशोत्सवासाठी नियोजन करून देण्यात आले आहे. पुण्यातील गणेश मंडळांना काही नियम व अटी घालून देण्यात आल्या आहेत. त्यामध्ये गणपतीची मूर्ती किती फुटाची असावी, मंडपाची उंची किती असावी याबाबत काही नियम आणि अटी लागू केल्या आहेत. चला तर पाहुयात काय आहेत नियम
२०१९ पासून गणेश मंडळांचे उत्सव मंडप, स्वागत कमानी आणि रनिंग मंडप इत्यादींच्या परवानग्या ग्राह्य धरण्यात येणार आहेत. ज्या मंडळांना नव्याने गणेश उत्सव साजरा करायचा असेल त्या मंडळांना परवानगी असणे गरजेचे आहे.त्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. २०१९ मध्ये मंडपासाठी परवानगी घेतली आहे किंवा नवीन मंडप उभारण्याचा असेल तर परवानगी घेणे गरजेचे आहे. मंडपाची उंची ४० फुटापेक्षा जास्त नसावी. ४० फुटापेक्षा जास्त मोठा मंडप उभारायचा असल्यास सुरक्षेची काळजी घ्यावी. कमानीच्या दर्शनी भागात प्लास्टिक कोटिंगमध्ये सहजपणे दिसतील अशा ठिकाणी लावाव्यात.मनपा शाळांची पटांगणे, मनपा मोकळ्या जागा गणेशमूर्ती विक्री स्टॉलसाठी उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत.मंडप आणि स्वागत करते वेळी अग्रिशमन, रुग्णवाहिका तसेच प्रवासी बसेस, रहदारी करण्यासाठी रस्ता मोकळा ठेवावा. कमानीची उंची १८ फुटापेक्षा जास्त राहील याची काळजी घ्यावी.
उत्सव साजरा करताना शाडू मातीच्या आणि पर्यावरणपूरक मुर्त्याना प्राधान्य द्यावे. मंडळ किंवा नागरिक यांनी पर्यावरणपूरक उपक्रमांवर भर द्यावा, असे आवाहन पालिकेने केले आहे. सर्व गणेश मंडळांनी दिलेल्या नियमांचे पालन करावे. उत्सव संपल्यानंतर ३ दिवसाच्या आत सर्व मंडप आणि सामान, विटांमधील बांधकामे, देखाव्यातील मूर्ती रस्त्याच्या बाजूला करावे. तसेच रस्त्यावरील सर्व खडे बुजावावे असे आदेश देण्यात आले आहेत.
हे ही वाचा:
जालना शहरात पुन्हा दगडफेक आणि लाठीचार्ज, पोलिसांकडून शांतता राखण्याचे आवाहन
‘Tiger 3’ चं फर्स्ट पोस्टर आऊट, सलमान आणि कतरिनाच्या लूकने केलं सर्वानांच…
जालन्यातील मराठा समाजाच्या आंदोलनावर उद्धव ठाकरेंनी केली भाजपवर खोचक टीका…