कोळी (Koli) लोकांचा खास सण म्हणजे नारळी पौर्णिमा (Narali Purnima) होय. समुद्राचा कोप होऊ नये, जहाजे, नौका सुरक्षित रहाव्यात, समुद्र शांत होण्यासाठी कोळी बांधव या दिवशी समुद्राची (Sea) पूजा करतात. पूजेसाठी समुद्राला यथाशक्तीप्रमाणे सोन्याचा नारळ अथवा साधा नारळ अर्पण करत असतात. म्हणून या सणाला ‘नारळी पौर्णिमा’ असे म्हणतात. सण म्हटला म्हणजे आपण एकमेकांना किंवा आपल्या जवळच्या व्यक्तींना शुभेच्छा देतोच तर नारळी पौर्णिमेनिमीत्त शुभेच्छा देण्यासाठी यांचा नक्कीच उपयोग होईल…
- नारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्राला येते भरती,
दर्याराजा शांत होण्यासाठी बांधव प्रार्थना करती..
घराघरात आज नैवेद्याला नारळीभात,
सागराला सोन्याचा नारळ अर्पित करून मासेमारीला होते सुरुवात..
नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! - सण आज आला नारळी पौर्णिमेचा, सागरपुत्रांच्या आनंदाचा
दर्या राजा असे देव त्यांचा, रक्षणकर्ता तो सकलांचा
नारळी पौर्णिमा तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला आनंद घेऊन येवो,
समुद्र देव शुभाशिर्वाद देऊन तुम्हांला सौख्य, मांगल्य देवो
नारळी पूर्णिमा शुभेच्छा! - नारळी पौर्णिमेनिमित्त
सागराला श्रीफळ अर्पण करताना
सर्व कोळी बांधवांच्या
समृद्ध जीवनाचा संकल्प करूया..
समस्त कोळी बांधवाना आणि संपूर्ण महाराष्टाला
नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..! - कोळी बांधवांची परंपरा,
मांगल्याची, श्रद्धेची, समुद्रदेवतेच्या पूजनाची..
नारळी पौर्णिमेच्या कोळीबांधवाना मनःपूर्वक शुभेच्छा..!! - दर्याचे धन तुझ्या होरीला येऊ दे..
माझ्या कोळीबांधवांना सुखाचे दिस येऊ दे..
नारळी पौर्णिमेच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा..!! - सन आयलाय गो, आयलाय गो
नारली पुनवेचा..
मनी आनंद मावना,
कोळ्यांच्या दुनियेचा..
नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा…!
हे ही वाचा:
Raksha Bandhan 2023, भावा-बहिणीचं अतुट नातं जपण्यासाठी रक्षाबंधनच्या दिवशी द्या ‘या’ शुभेच्छा…
Asia Cup 2023, भारतीय टीमला मोठा झटका, केएल राहुल संघाबाहेर ‘या’ खेळाडूला मिळणार संधी…