Thursday, November 30, 2023

Latest Posts

Navratri 2023, यंदाच्या वर्षी नवरात्रमध्ये नेमके कोणते रंग आहेत तुम्हाला माहित आहे का? जाणून घ्या रंग आणि महत्व

देशभरात गणेशोत्सवानंतर आता नवरात्री उत्सवाची लगबग चालू झाली आहे. संस्कृतमध्ये नवरात्री शब्दला नऊ रात्र असे म्हंटले आहे.

देशभरात गणेशोत्सवानंतर आता नवरात्री उत्सवाची लगबग चालू झाली आहे. संस्कृतमध्ये नवरात्री शब्दला नऊ रात्र असे म्हंटले आहे. या नऊ रात्रीमध्ये दुर्गा देवीची पूजा केली जाते. चैत्र आणि शारदीय नवरात्र उत्सव मोठ्या प्रमाणावर सगळीकडे साजरा केला जातो. अश्विन महिन्यात येणाऱ्या नवरात्रीला शारदीय नवरात्र उत्सव असे म्हंटले जाते. दुर्गा पूजनासाठी शारदीय नवरात्र सर्वश्रेष्ठ मानले जाते. शारदीय नवरात्री उत्सवाचे नऊ दिवस अत्यंत पवित्र आणि शुभ मानले जातात. नवरात्रीमध्ये देवीच्या पूजनामुळे शक्ती, ज्ञान, आनंद, सुख, समृद्धी, समाधान, कीर्ती, मान, सन्मान, धन-वैभव प्राप्त होते. तसेच भगवती देवीच्या पूजनामुळे कुटुंबात सुख, शांतता नांदते. हिंदू धर्मात नवरात्री अर्थात घटस्थापने देवीची पूजा केली जाते. नवरात्री दरम्यान नऊ दिवस उपवास व देवीची पूजा करण्यात येते. तसेच नऊ रात्रीच्या नऊ रंगांना देखील खूप महत्व आहे. चला तर पाहुयात नवरात्रीचे नऊ रंग का महत्वाचे मानले जातात.

पहिला रंग (१५ ऑक्टोबर) नारंगी:-

नारंगी रंग बल आणि शक्तीचे प्रतीक आहे. हा रंग सकारात्मक ऊर्जेने मूर्त आहे आणि मनाला उत्साही ठेवतो.

दुसरा रंग (१६ ऑक्टोबर) पांढरा:-

पांढरा रंग शक्ती, शांती, ज्ञान, तपस्या इत्यादींचे प्रतीक आहे. तसेच पांढऱ्या रंगाचे कपडे घातल्याने अतनाविश्वास वाढतो.

तिसरा रंग (१७ ऑक्टोबर) लाल:-

लाल रंग शांती, साहस, पराक्रम आणि प्रेमाचे आणि पवित्रतेचे प्रतीक आहे.लाला रंग हा खूप शुभ मानला जातो.

चौथा रंग (१८ ऑक्टोबर) निळा:-

निळा रंग साहस, बलिदान व असत्यावर सत्याचा विजयाचे प्रतीक आहे .हा रंग समृद्धी आणि शांतता दर्शवतो.

पाचवा रंग (१९ ऑक्टोबर) पिवळा:-

पिवळा रंग भक्तांना संतती, समृद्धी, स्नेह आणि मोक्ष चा आशीर्वाद देते. सौभाग्याचा, संपत्तीचा आणि वैभवाचे देखील प्रतीक मानले जाते.

सहावा रंग (२० ऑक्टोबर)  हिरवा:-

हिरवा रंग आनंद आणि प्रकाशाचे प्रतिक आहे. हिरवा रंगाचे कपडे धारण केल्यानं चैतन्यामध्ये वृद्धी होते. हिरवा रंग जीवनातील नवीन सुरुवात

सातवा रंग ( २१ ऑक्टोबर) राखाडी:-

राखाडी रंग नवीन सुरुवात आणि विकासाचे प्रतीक आहे. देवी कात्यायनी यांनी महिषासुर राक्षसाचा अंत केला होता.

आठवा रंग (२२ ऑक्टोबर) जांभळा:-

जांभळा रंग प्रेम, स्नेह आणि सद्भावाचे प्रतिक आहे.

नऊवा रंग (२३ ऑक्टोबर) मोरपिसी:-

मोरपिसी रंग समृद्धी, नाविण्यता, ऊर्जा, महत्वकांक्षा आणि दृढ विश्वासाचे प्रतीक आहे. निळ्या आणि हिरव्या रंगाच्या या विशेष मिश्रणाचा वापर केल्याने दोन्ही रंगांच्या गुणांचा (समृद्धी आणि नवीनता) फायदा होतो.

Latest Posts

Don't Miss