Ganeshotsav 2023:- आजपासून गणेश उत्सवाला सुरुवात झाली आहे. राज्यभरात गणपती बापाच्या आगमनाची सगळेच आतुरतेने वाट पाहत होते. गणेश उत्सवासाठी आता पुणेकर सज्ज झाले आहेत. ढोलताशाच्या गजरात पुण्यातील मानाच्या बाप्पाचे आगमन होणार आहे.बापाच्या स्वागतासाठी पुण्यात रांगोळ्यांच्या पायघड्या घालण्यात आल्या आहेत. तर पुण्यातील ढोल ताशा पथक आता बाप्पाच्या आगमनासाठी सज्ज झाली आहेत. गणपती बापाच्या आगमनामुळे संपूर्ण पुण्यात आनंदाचे आणि मंगलमय वातावरण निर्माण झाले आहे. पुण्यातील प्रत्येक घराघरात बापाच्या आगमनाची ओढ निर्माण झाली आहे. यातच आता पुण्यातील मानाच्या गणपतीचे आगमन होणार आहे. सर्व पुणेकर लक्ष्मी रस्ता आणि बाजीराव रस्त्यावर एकत्र यायला सुरुवात झाली आहे.
पुण्यातील मानाचा पहिला श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या मिरवणुकीला आता सुरुवात होणार आहे. सकाळी ७. ४५ मिनिटांनी मंदिरात आरती झाली आहे. गणेशोत्सवानिमित्त भाविकांनी मंदिरात दर्शनासाठी रांगा लावायला सुरुवात केली आहे. आरती होईल आणि बाप्पाचा जयजयकार केल्यानंतर मिरवणुकीला सुरुवात होईल. दगडूशेठ गणपतीच्या मिरणवुकीसाठी जोरदार तयारी चालू आहे. पुण्यातील मंडई परिसरात, बेलबाग चौकात आणि लक्ष्मी रस्त्यांवर बाप्पाच्या आगमनासाठी मोठं मोठ्या रांगोळ्या काढण्यात आल्या आहेत. पुण्यात रांगोळी काढण्यासाठी वेगवेगळ्या गावातून कलाकार आले आहेत. बापाच्या आगमनासाठी आता पुणेकर सज्ज झाले आहेत. मागील दोन ते तीन महिने पुण्यातील ढोलताशा पथकांचा सराव सुरु होता. या आगमनासाठी पुण्यातहज़ारो वादक एकत्र आले आहेत. बेलबाग चौकात, लक्ष्मी रस्त्यावर आणि प्रत्येक मानाच्या आणि महत्वाच्या गणपतीसमोर ढोल ताशा पथकं वादनासाठी सज्ज झाले आहे.
हिंदुस्तानातील पहिला सार्वजनिक गणपती असलेल्या ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’च्या वतीने भव्य दिव्या महालाचा देखावा साकारण्यात येतो. ‘ॐकार महाल’ तयार करण्यात आला आहे. या देखाव्याची संकल्पना जान्हवी धारिवाल- बालन यांची असून यावरील नक्षीकाम प्राचीन शैलीतील कापडाची प्रेरणा घेऊन करण्यात आली आहे. महालाच्या गाभाऱ्यातील छतावर ‘ॐ गं गणपतये नमो नम: ’ हा मंत्र लिहलेला आहे. या गाभाऱ्यात होणाऱ्या मंत्रोच्चारामुळे येथील वातावरण कायमच प्रसन्न आणि भक्तीमय राहणार आहे.
हे ही वाचा:
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी अभिनेता कार्तिक आर्यन याने लावली हजेरी
“सुंदर माझा बाप्पा!” गणेशोत्सव स्पर्धा २०२३