भावा बहिणींच्या प्रेमळ नात्याची आठवण करून देणारा सण म्हणजे रक्षाबंधन (Raksha Bandhan) हा होय. बहीण-भावांमधील प्रेम वृद्धिंगत करणारा, नातेसंबंध दृढ करणारा आणि सुदृढ भावबंधाचे रेशीम धागे असेच घट्ट राहोत, याचा शाश्वत आशावाद देणारा सण म्हणजे रक्षाबंधन. श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो. उद्या ३० ऑगस्ट रोजी रक्षाबंधन असले तरी भद्राकाळ पाहिल्यास ३१ ऑगस्टला रक्षाबंधन साजरा करावा असे सांगितले जात आहे. तरी आपआपल्या श्रद्धेनुसार सर्व रक्षाबंधन साजरा करतील, तसेच या दिवशी बरेच लोक रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देतात, म्हणून काही खास शुभेच्छा संदेश.
- दादा जुन्या झाल्या त्या विचार धारा,
नवीन आला विचारांचा वारा..
नाही केले रक्षण माझे तरी चालेल,
राखी बांधल्यावर पैसे मात्र मोजावे लागेल…
Happy Rakshabandhan - आपल्या बहिणीसारखी दुसरी मैत्रीण
कोणीच नसते नशीबवान असतात
ते ज्यांना बहीण असते
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा! - थोडी लढणारी, भांडणारी, चिडणारी
थोडी काळजी घेणारी मस्ती करणारी
एक बहीण असते तीच तर राखी
पौर्णिमेची खरी शान असते
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा! - तूच माझा आधार तूच माझं सर्वस्व..
देवाचे आभार तुझ्या
रुपाने ताई मला दिला मोठा आधार,
राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! - आजचा दिवस खूप खास आहे
कारण आज माझ्याकडे तुझ्यासाठी
काही तरी खास आहे तुझ्या सगळ्या
गोष्टीसाठी तुझा भाऊ तुझ्या जवळ आहे
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा! - भाऊ-बहिणीचे अतूट नाते
रेशमी धाग्यांनी विणणारा सण
रक्ता-नात्याची असो वा मानलेली
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!
हे ही वाचा:
Asia Cup 2023, भारतीय टीमला मोठा झटका, केएल राहुल संघाबाहेर ‘या’ खेळाडूला मिळणार संधी…
बच्चू कडू यांनी केली Sachin Tendulkar कडे मागणी