नवरात्रीची सांगता दसरा या सणाने होते. एकदा दसऱ्याचा सण झाला की सर्वांना वेध लागते ते दिवाळी या सणाचे. दिवाळी सण हा प्रकाशाचा, आनंदाचा आणि दिव्यांचा सण आहे त्यामुळे दिवाळी या सणाची सारे जण आतुरतेने वाट पाहत असतात . यंदाच्या दिवाळीची सुरुवात ९ नोव्हेंबर गुरुवारी होणार असून या दिवशी वसुबारस हा सण आहे. वसुबारस हा दिवाळीचा सर्वात पहिला दिवस असून या वसुबारस सणाला पूजा कशी करायची? पूजेचा मुहूर्त काय? याबद्दल आपण जणून घेऊयात.
कधी आहे दिवाळीचा पहिला दिवस म्हणजेच वसुबारस?
वसुबारसच्या सणाने दिवाळीची सुरुवात होते. यंदाची वसुबारस ९ नोव्हेंबरला आहे. या वसुबारच्या दिवशी गाय – वासराची पूजा केली जाते. त्यांची पूजा करून गोडधोडाचा नैवेद्य केला जातो.
वसुबारची पूजा कशी करावी?
वसुबारस आश्विन कृष्ण पक्ष एकादशीच्या दिवशी आहे. वसूबारसच्य दिवशी गोवत्स द्वादशी आणी रमा एकादशी देखिल असणार आहे. या दिवशी रात्री गाय- वासराची पूजा करावी. या दिवशी सायंकाळी गाई-वासराची पूजा करताना घरातील सूवासिनी गाईच्या पायांवर पाणी घालतात आणि हळद-कुंकू अक्षता वाहतात. शिवाय, ज्यांच्या घरी पाळीव गुरे, गाई-वासरू आहेत, त्यांच्या घरी वसूबारसच्या दिवशी पुरणपोळीचा स्वयंपाक आणि नैवेद्य देखील केला जातो. गाईला कुंकू-हळद आणि अक्षदा वाहिल्यानंतर तिला निरांजनाने ओवाळले जाते. त्यानंतर, गाई-वासराला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून खायला दिला जातो.वसुबारसच्या दिवशी अंगणात छान रांगोळी काढून दिवाळीच्या सणाला सुरूवात केली जाते. रांगोळी, कंदील आणि दिव्यांची सजावट केली जाते.
दिवाळीचा पहिला दिवा वसुबारसेच्या दिवशी लावला जातो. तसेच, या दिवशी उडदाचे वडे, भात आणि गोडाधोडाचे पदार्थ नैवेद्यासाठी आवर्जून केले जातात व हे पदार्थ गाई-वासराला खाऊ घातले जातात. वसुबारसेला सण सगळीकडे उत्साहात साजरा करत दिवाळी या सणाचे जल्लोषात स्वागत केलं जातं.
हे ही वाचा :
इको-फ्रेंडली दिवाळी कशी साजरी करायची,जाणुन घ्या या ५ सोप्या टिप्स
जगातील पाचव्या क्रमांकाचा श्रीमंत व्यक्ती एकेकाळी बिल गेट्सचा सहाय्यक..