Thursday, April 18, 2024

Latest Posts

Vat Pornima 2023: वट पौर्णिमेनिमित्त तुमच्या पतीला द्या ह्या खास शुभेच्छा

वट पौर्णिमा ही काही दिवसांवर आली असून स्त्रियांमध्ये भरपूर उत्साह निर्माण झाला आहे. वट पौर्णिमेच्या निमित्ताने बाजारातसुद्धा महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येते. वट पौर्णिमेच्या निमित्ताने स्त्रिया मोठ्या प्रमाणावर खरेदी करण्यास बाजारात जात आहेत.

वट पौर्णिमा ही काही दिवसांवर आली असून स्त्रियांमध्ये भरपूर उत्साह निर्माण झाला आहे. वट पौर्णिमेच्या निमित्ताने बाजारातसुद्धा महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येते. वट पौर्णिमेच्या निमित्ताने स्त्रिया मोठ्या प्रमाणावर खरेदी करण्यास बाजारात जात आहेत. वटपौर्णिमेच्या दिवशी बायका वडाच्या झाडाची पूजा करतात. या दिवशी वैवाहिक स्त्रिया या आपल्या नवर्याच्या उत्तम तसेच निरोगी आयुष्यासाठी वट सावित्रीचे व्रत पाळतात. आपल्याला जन्मोजन्मी हाच नवरा मिळूदे अशी प्रार्थना त्या करतात. वटपौर्णिमेच्या दिवशी स्त्रिया अगदी साजशृंगार करून वडाच्या झाडाची पूजा करण्यास बाहेर जातात. काही स्त्रिया घरीच पूजा करून वट सावित्रीचे व्रत पाळतात. स्त्रियांना वटपौर्णिमेचे भरपूर आकर्षण असते. यावेळी स्त्रिया आपल्या नवऱ्यासाठी मस्त उखाणे घेतात. यावर्षी वटपौर्णिमेची पूजा ही ३ जून २०२३ रोजी साजरी केली जाणार आहे. पत्नी आपल्या पतीला वटपौर्णिमेनिमित्त शुभेच्छा देते. पण नेहमी साध्या शुभेच्छा देण्यापेक्षा यावेळी आपल्या नवऱ्याला काही हटके शुभेच्छा द्या. त्यासाठी आपण जाणून घेऊया वटपौर्णिमेच्या हटके शुभेच्छा

वडाच्या झाडाइतकं दीर्घायुष्य मिळो तुला
जन्मोजन्मी असाच तुझा सहवास लाभो मला
वटपौर्णिमेच्या मनापासून शुभेच्छा

सप्तजन्मीचे सात वचन,
साथ देणार तुला कायम,
वटपौर्णिमेच्या दिवशी व्रत करून,
फक्त तुझ्या प्रेमाची ओढ कायम.
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

एक फेरा आरोग्यासाठी, एक फेरा प्रेमासाठी, एक फेरा यशासाठी
एक फेरा दीर्घायुष्यासाठी, एक फेरा तुझ्या माझ्या अतूट सुंदर नात्यासाठी
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

वडाच्या झाडाइतकं दीर्घायुष्य मिळो तुला
पुढले सातही जन्म तुझाच सहवास मिळो मला
वटसावित्री हार्दिक शुभेच्छा

दोन क्षणाचे भांडण
सात जन्माचे बंधन
लाभून तुमची साथ झाले मी पावन
नेहमी आनंदी राहो आपले सहजीवन
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.

सप्तपदींच्या सात फेर्‍यांनी बांधलेलं
हे प्रेमाचं बंधन, कायम जन्मोजन्मी राहो,
कोणाचीही लागो ना नजर या संसाराला,
दरवर्षी अशीच येवो ही वटपौर्णिमा
वटपौर्णिमेच्या शुभेच्छा !

 

हे ही वाचा : 

पाहा रवी शास्त्रींची प्लेइंग ११, या खेळाडूंना टीममध्ये घेणे टाळले

Vat Pournima 2023: ‘या’ कारणासाठी साजरी करतात वटपौर्णिमा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss