Friday, April 19, 2024

Latest Posts

Vat Pournima 2023: या कारणामुळे वडाच्या झाडाला दोरा गुंडाळला जातो…

वटपौर्णिमा हा स्त्रियांच्या आयुष्यातील फार महत्वाचा दिवस असतो. या सणाच्या दिवशी स्त्रिया वटसावित्रीचे व्रत पाळतात. आपल्याला जन्मोजन्मी हाच नवरा मिळू दे यासाठी स्त्रिया हे व्रत करतात.

वटपौर्णिमा हा स्त्रियांच्या आयुष्यातील फार महत्वाचा दिवस असतो. या सणाच्या दिवशी स्त्रिया वटसावित्रीचे व्रत पाळतात. आपल्याला जन्मोजन्मी हाच नवरा मिळू दे यासाठी स्त्रिया हे व्रत करतात. धार्मिक मान्यतेनुसार हे व्रत केल्याने आपल्या पतीला उत्तम व दीर्घकालीन आयुष्य लाभते असे मानले जाते. यादिवशी स्त्रिया साजशृंगार करून वडाच्या झाडाची पूजा करण्यास जातात. यादिवशी उपवासाला देखील फार महत्व आहे. या दिवशी सर्व स्त्रिया एकत्रित येऊन वडाच्या झाडाची पूजा करतात. वडाच्या झाडाची पूजा करताना त्या वडाच्या झाडाला दोरा गुंडाळत सात प्रदक्षिणा पूर्ण करतात. पण तुम्हाला माहित आहे का वडाच्या झाडाला दोरा का गुंडाळला जातो. ही परंपरा प्राचीन काळापासून चालत आली आहे आणि अजूनही स्त्रिया ही परंपरा अगदी उत्साहाने पुढे चालवत आहे. चला तर मग जाणून घेऊया वडाच्या झाडाला दोरा का गुंडाळला जातो.

वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करताना महिला वडाच्या झाडाला दोरा का गुंडाळतात या बद्दल असे सांगण्यात येत की वटवृक्षाच्या खोडाच्या उभ्या छेदांवर असणाऱ्या सुप्त लहरी शिवतत्व आकृष्ट करून वायूमंडलात प्रक्षेपित करतात. जेव्हा महिला वडाच्या झाडाला सुती दोरा गुंडाळतात तेव्हा जिवाच्या मनातील भावाप्रमाणे खोडातील शिवत्त्वाशी संबंधित लहरी कार्यरत होऊन आकार धारण करतात आणि सुती दोरा गुंडाळल्याने पृथ्वी आणि आप या तत्वाच्या संयोगाने या लहरी जीवाला ग्रहण करण्यास सुलभ होतात. याबद्दल असेही सांगण्यात येते की जेष्ठ महिन्यात वडाच्या झाडाच्या पारंब्यांना कोंब फुटायला प्रारंभ होतो. पावसाळ्यात हे कोंब चांगलेच मोठे होत असून वडाच्या झाडाच्या पारंब्याचा औषधे बनविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जातो.

पूर्वीच्या काळी पावसामुळे हवामान बदलून बरेच आजार होत असत त्यामुळे वडाच्या झाडाच्या पारंब्याचा औषध बनविण्यासाठी उपयोग केला जात असत. आधीच्या काळात लहान लहान मुले या पारंब्यांच्या आधारे झोका घेऊन खेळ खेळत असत. त्यावेळी हे कोंब नष्ट होण्याची शक्यता असायची म्हणून पूर्वीच्या काळी झाडाची पूजा करताना त्याला दोरा गुंडाळण्याची प्रथा सुरु झाली असावी. दोरा बांधल्याचे दिसत असल्याने लोकांना समजतं की या झाडाची पूजा झाली आहे म्हणून काही दिवस तरी लोक वडाच्या झाडाच्या पारंब्यांना लोम्बकळत नाहीत. अशामुळे वडाच्या पारंब्यांचे कोंब हे सुरक्षित राहतात. या उद्देशाने वडाच्या झाडाला दोरा गुंडाळण्यात येतो असे सांगितले जाते.

हे ही वाचा:

Vat Pournima 2023: वटपौर्णिमेनिमित्त अशा पद्धतीने सजवा पूजेचे ताट

बीडमधून केली एका शेतकरी मुलाने गौतमीला लग्नाची मागणी

CSK vs GT, नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा धोनीचा निर्णय

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss