Thursday, April 25, 2024

Latest Posts

Vat Pournima 2023: हे पदार्थ खाऊन सौभाग्यवतींनी वटपौर्णिमेचा उपवास सोडावा

सौभाग्यवतींसाठी वटपौर्णिमेचा सण हा फार महत्वाचा मानला जातो. या दिवशी अनेक स्त्रिया वटसावित्रीचे व्रत पाळतात. आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी हा व्रत विवाहित महिलांकडून पाळला जातो.

सौभाग्यवतींसाठी वटपौर्णिमेचा सण हा फार महत्वाचा मानला जातो. या दिवशी अनेक स्त्रिया वटसावित्रीचे व्रत पाळतात. आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी हा व्रत विवाहित महिलांकडून पाळला जातो. वटसावित्राचे हे व्रत अगदी प्राचीन काळापासून पाळले जात असून आजही स्त्रिया तितक्याच उत्साहात वटसावित्रीचे व्रत पाळतात. आजही स्त्रियांनी ही परंपरा सुरु ठेवली असून अगदी पारंपरिक पद्धतीनेच स्त्रिया हे व्रत पार पाडतात. या दिवशी स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात.वटपौर्णिमेच्या दिवशी उपवासाला फार महत्व असते. या दिवशी प्रत्येक स्त्रिया आपल्या नवऱ्याच्या उत्तम आयुष्यासाठी उपवास करतात. परंतु काही वेळेस उपवासाचा त्रास होऊ शकतो. उपवासाच्या दिवशी काहींना आरोग्याशी निगडित अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. मळमळणे, आंबटपणा, कमी रक्तदाब अशा काही समस्यांना सामोरे जावे लागते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला उपवास कसा ठेवावा याबद्दल थोडक्यात सांगणार आहोत.

सिझनची फळे खा –

वटपौर्णिमेच्या दिवशी स्त्रिया उपवास करतात. पण उपवासाच्या दिवशी स्त्रियांना काय खावे असा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित होतो. काही महिला उपवासाला चालणारे काही तेलकट पदार्थ खातात पण त्यामुळे एसिडिटी (Acidity) च्या त्रासाला सामोरे जावे लागते. परंतु उपवासाच्या दिवशी फळांचे सेवन केलेले कधीही चांगले. अनेक आहार तज्ज्ञांच्या मते उपवासा दरम्यान भरपूर फळे खावीत. त्याने आपल्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही.

सुकामेवा खा –

उपवासाच्या दिवशी खजूर, मनुका ,जर्दाळू असा सुखामेवा खाऊ शकता. आपले पोट जेव्हा रिकामे असते तेव्हा आपल्या शरीरात जळजळ होते तसेच रिकामे पोट असले तर एसिडिटीचा त्रास होतो त्यामुळे अशावेळी मनुकांचे सेवन केल्याने आपल्याला एसिडिटीचा त्रास होत नाही.

कॉफीचे सेवन टाळावे –

अनेक महिलांना दररोज कॉफी पिण्याची सवय असते. त्यामुळे उपवासाच्या दिवशी देखील कॉफी पिण्यास त्या प्राधान्य देतात. परंतु उपवसांनंतर कॉफीचे सेवन करणे हे आपल्या आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. उपवास सोडल्यानंतर कॉफीचे सेवन केले तर आपल्या शरीरातील आम्ल पातळी वाढण्याचा धोका निर्माण होतो आणि म्हणूनच पोटात जडपणा तसेच छातीत जळजळ होण्याच्या समस्या वाढू शकतात.

प्रोटीनयुक्त खाद्य पदार्थ खा –

उपवास सोडल्यानंतर जास्तीत जास्त प्रोटीनयुक्त आहार करण्याची गरज आहे. उपवास सोडल्यानंतर प्रोटीनयुक्त आहार केला की उपवासात कमी झालेली ऊर्जा लगेच भरून निघते. त्यामुळे उपवासानंतर प्रोटीनयुक्त आहार करण्यावर भर द्या.

Latest Posts

Don't Miss