Thursday, March 28, 2024

Latest Posts

Vat Purnima 2023, यंदा वटपौर्णिमा आहे ‘या’ तारखेला, जाणून घ्या मुहूर्त आणि महत्व

प्रत्येकवर्षी आपण मोठ्या उत्साहाने वटपौर्णिमा साजरी करतो. लग्नानंतर बायका ह्या आपल्या नवर्याच्या दीर्घायुष्यासाठी वट सावित्री व्रत पाळतात. हे व्रत केल्यानंतर आपल्या पतीला जास्त आणि सुखकर आयुष्य लाभते असे मानून बायका हा व्रत श्रद्धेने करतात.

प्रत्येकवर्षी आपण मोठ्या उत्साहाने वटपौर्णिमा साजरी करतो. लग्नानंतर बायका ह्या आपल्या नवर्याच्या दीर्घायुष्यासाठी वट सावित्री व्रत पाळतात. हे व्रत केल्यानंतर आपल्या पतीला जास्त आणि सुखकर आयुष्य लाभते असे मानून बायका हा व्रत श्रद्धेने करतात. आपल्याला पुढचे सात जन्म हाच जोडीदार मिळावा अशी प्रत्येक पत्नीची मनापासून इच्छा असते त्यासाठी ती हा वट सावित्रीचा व्रत पाळते. हे व्रत पाळल्याने आपले विवाहनंतरचे आयुष्य आपल्या जोडीदारासोबत आनंद व आपल्या जीवनात समृद्धी येते असे मानले जाते. हे व्रत केल्यावर आपल्याला सात जन्म हाच नवरा मिळतो अशी धार्मिक मान्यता आहे. चला तर मग जाणून घेऊया या वर्षी वटपौर्णिमा कोणत्या तारखेला आहे आणि या व्रताचे काय महत्व आहे.

वट सावित्री व्रताची तिथी –

वट सावित्री व्रत हे यावर्षी ३ जून २०२३ या तारखेला जेष्ठ पौर्णिमे रोजी पाळले जाणार आहे. हे व्रत भारतात प्रामुख्याने महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यात पाळले जाते. देशाच्या काही राज्यांमध्ये हे व्रत जेष्ठ महिन्याच्या अमावस्येला पळले जाते. पंचांगानुसार ३ जून २०२३ रोजी जेष्ठ पौर्णिमेला वट सावित्रेचे पालाल जाईल. सकाळी ११ वाजून १७ मिनिटांनी पौर्णिमेस सुरुवात होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच ४ जून २०२३ रोजी सकाळी ९ वाजून ११ मिनिटांनी पौर्णिमा समाप्त होणार आहे. तुम्हाला या कालावधीत वडाची श्रद्धेने पूजा करता येईल.

वट सावित्री व्रताचे महत्व –

आपल्या नवऱ्याला दीर्घकालीन आयुष्य लाभुदे या भावनेने पत्नी वट सावित्रीचे व्रत पाळते. हे व्रत केल्याने पतीचे आयुष्य सुखी होते व त्याच्या समस्या दूर होतात अशी धार्मिक मान्यता आहे. या वटसावित्रीच्या पौराणिक कथेनुसार सावित्री देवीने हा व्रत करून मुर्त्यूची देवता यमराजाने सावित्री देवीच्या पतीला म्हणजेच सत्यवानाला जीवदान दिले. त्यामुळे धार्मिक मान्यतेनुसार हा व्रत केल्याने आपले वैवाहिक जीवन सुखकर होते आणि आपल्या वैवाहिक जीवनात येणाऱ्या सर्व अडचणी दूर होतात. म्हणून आजही प्रत्येक पत्नी तितक्याच श्रद्धेने हे व्रत उत्साहाने करते आणि न चुकता प्रत्येकवर्षी वटपौर्णिमेला वटवृक्षाची पूजा करते.

वटवृक्षाच्या पूजे मागचे धार्मिक महत्व –

हिंदू धर्मानुसार वटवृक्षच्या खोडात विष्णू, मुळात ब्रह्म तसेच फंद्यात साक्षात महादेव शंकर विराजमान आहेत असे मानले जाते. त्याचबरोबर वादाच्या झाडांना पारंब्या असतात आणि त्या पारंब्यांना सावित्री देवीचे रूप मानले जाते. वडाच्या झाडाची पूजा हि प्रत्येक स्त्री श्रद्धेने करते. देवाचे आशीर्वाद लाभण्यासाठी, मनातल्या सर्व इच्छा आकांशा पूर्ण होण्यासाठी स्त्री निर्मळ मानाने वटसावित्रीचे व्रत करते. त्याचप्रमाणे असे मानले जाते की अपत्य प्राप्तीसाठी देखील काही स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात. वादाच्या झाडाचे आयुष्य हे दीर्घकालीन असते. सावित्री देवीने जेष्ठ महिन्यातील पौर्णिमेला वट वृक्षा खाली आपल्या पतीला म्हणजेच सत्यवानाला जीवदान मिळवून दिले. आणि याच दिवसापासून वटाच्या वृक्षाची पूजा सर्वत्र केली जाऊ लागली. वटवृक्षाला साक्षात महादेव शिव शंकर यांचे प्रतीक मानून अगदी श्रद्धेने पत्नी या वृक्षाची पूजा करते.

हे ही वाचा : 

का चापट मारली सुषमा अंधारेंना ठाकरे गटाच्या जिल्याप्रमुखांनी?

IPL2023, Orange cap आणि purple cap च्या शर्यतीत एका सामन्यामुळे झाला फेरबदल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो कर.

Latest Posts

Don't Miss