Sunday, May 28, 2023

Latest Posts

Vat Purnima 2023, जाणून घ्या वटपौर्णिमेची पौराणिक कथा….

दरवर्षी सर्व विवाहित महिला या वटपौर्णिमेच्या दिवशी वादाच्या झाडाची पूजा करतात. हे वटसावित्रीचे व्रत अनेक महिला अगदी श्रद्धेने पाळतात. जन्मोजन्मी हाच नवरा मिळूदे म्हणून हा व्रत केला जातो. आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी पत्नी हे व्रत निर्मळ मानाने करते.

दरवर्षी सर्व विवाहित महिला या वटपौर्णिमेच्या दिवशी वादाच्या झाडाची पूजा करतात. हे वटसावित्रीचे व्रत अनेक महिला अगदी श्रद्धेने पाळतात. जन्मोजन्मी हाच नवरा मिळूदे म्हणून हा व्रत केला जातो. आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी पत्नी हे व्रत निर्मळ मानाने करते. या व्रताच्या प्रभावामुळे आपले वैवाहिक जीवन हे सुखी होते असे मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार हे वटसावित्री व्रत केल्याने आपल्या पतीच्या सर्व समस्या व अडचणी दूर होतात. आपल्याला सात जन्म हाच नवरा मिळूदे यासाठी महिला वट वृक्षाची पूजा करतात. अगदी प्राचीनकाळापासून अनेक महिला ही प्रथा पाळतात. यावर्षी वटपौर्णिमा ही ३ जून २०२३ रोजी ज्येष्ठ माहिन्यातील पौणिमेला साजरी केली जाणार आहे. यादिवशी वडाच्या झाडाला भरपूर महत्व आहे. वडाच्या वृक्षाचे आयुष्य हे अखंड असते असे मानले जाते. आधीच्या काळात स्त्रिया या श्रद्धेने तीन दिवसांचे व्रत करायच्या पण आता सध्याच्या काळात स्त्रीया या आपल्या नवर्याच्या दीर्घायुष्यासाठी पौर्णिमेच्या दिवशी उपवास करतात. आणि वट वृक्षाची पूजा करतात.

पण तुम्हाला माहित आहे का, यामागे काही शास्त्रीय करणेही सांगितलेली आहेत. याचे शास्त्रीय कारण म्हणजे वडाचे झाड आपल्याला भरपूर प्रमाणात ऑक्सिजन पुरवतो. ऑक्सिजन आपल्यासाठी किती गरजेचं असतो हे वेगळे सांगायला नको. आणि स्त्रियांनी वडाच्या झाडाभोती राहणे चांगले असते.याच कारणामुळे हे व्रत करणे फायदेशीर ठरते. यादिवशी स्त्रिया या एकमेकींना वाण देतात. यामुळेच स्त्रियांच्या हातून दान धर्माचे कार्य होते. वडाच्या झाडाला दोरा बांधण्याचे कारण म्हणजे जसे वडाचे झाड दीर्घकाळ जगते तसेच आपल्या नवऱ्यालाही दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून सुटणे भांडून ठेवले जाते. असे ठेवल्याने ते वाचते असा समज आहे.

वटपौर्णिमा साजरी करण्यामागचं कारण –

शेकडो वर्षांपूर्वी अश्वपती नावाचं एक राजा होता. त्याला एक कन्या असून तिचे नाव सावित्री होते. सावित्री ही अतिशय सुंदर, दिसायला देखणी, नम्र आणि प्रामाणिक होती. अश्वपती राजाने आपल्या कन्येला म्हणजेच सावित्रीला तिच्यासाठी पती निवडायची संमती दिली होती. सावित्रीने सत्यवान नावाच्या एका राजकुमाराला पसंत केलं. एका अंध राजाच्या पुत्र म्हणजेच सत्यवान त्याच्या आई वडिलांसोबत जंगलात राहत होता. शत्रूकडून हरल्यामुळे तो अंध राजा आपल्या राणी आणि पुत्रासहित जंगलात राहत होता. सत्यवानाचे आयुष्य हे फक्त एकाचाच वर्षाचे असून त्याच्यासोबत लग्न न करण्याचा सल्ला भगवान नारदनीं यांनी सावित्रीला दिला होता. परंतु सावित्रीने त्यांचे म्हणणे ऐकले नाही आणि सत्यवानाशी विवाह करून ती त्याच्या सोबत जंगलात येऊन सासू सासऱ्यांची सेवा करू लागली.

जेव्हा सत्यवानाचा मृत्यू तीन दिवसांवर येऊन उभा असताना सावित्रीने तीन दिवस उपवास करत व्रत केले. सत्यवान आणि सावित्री हे दोघे जंगलात लाकडे तोडायला गेले होते. सत्यवानाला लाकडे तोडताना चक्कर येऊन तो जमिनीवर पडला. त्यावेळी मृत्यूचा देव यम तेथे येऊन सत्यवानाचे प्राण नेऊ लागला. यम सत्यवानाला घेऊन जात असताना सावित्री देखील त्याच्या पाठी येऊ लागली म्हणून यमाने सावित्रीला मागे फिरण्याची विनंती केली. पण सावित्रीने मागे न फिरण्यास नकार दिला. शेवटी यमाने वैतागून तिला तीन वर मागण्यास सांगितले. त्यामध्ये सावित्रीने आपल्या सासू सासर्यांचे डोळे, राज्य आणि आपल्याला अपत्य व्हावे असा वर मागितला. यमाने तथास्तु म्हणत सत्यवानाचे प्राण परत केले. सावित्रीने सत्यवानाचे प्राण हे वडाच्या झाडाखालून परत मिळवले. याचकारणामुळे ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात.

हे ही वाचा : 

IPL सुरु असतानाही Anupamaa चा दर्जा कायम

ठाणे जिल्यात महावितरणाच्या या भागांमध्ये असणार वीजपुरवठा बंद

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो कर.

Latest Posts

Don't Miss