रक्षाबंधनाला बहीण-भावाच्या प्रेमाचा अतूट सण म्हणतात. बहिणी आपल्या भावांच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करतात आणि त्या बदल्यात भाऊ आपल्या बहिणींचे रक्षण करण्याचे वचन देतात. या दिवशी घरात एक वेगळीच चमक असते. बहिणी जाऊन भावांना राखी बांधतात किंवा भाऊ जाऊन बहिणींना पवित्र रेशीम धागा बांधायला आणतात. ज्याचा अर्थ प्रेम आणि कल्याणासाठी प्रार्थना आहे.
नियमानुसार, बहिणी या दिवशी उपवास करतात. भावाच्या मनगटावर राखी बांधली जाते, अक्षतला तिलक लावला जातो आणि मिठाई खायला दिली जाते. त्या बदल्यात, भाऊ बहिणींना भेटवस्तू देतात आणि त्यांचे संरक्षण करण्याचे वचन देतात. मात्र यंदा भाद्र कालावधी असल्याने रक्षाबंधनाचा सण केव्हा आणि कोणत्या दिवशी आहे, कोणत्या वेळी राखी बांधणे शुभ आणि कोणत्या वेळी राखी बांधल्याने अशुभ परिणाम होणार नाहीत, याबाबत सर्वांच्या मनात संभ्रम आहे.तर सविस्तर जाणून घेऊया.
यावर्षी दिनांक ३० ऑगस्ट २०२३ रोजी रक्षाबंधन हा पवित्र सण आलेला आहे. यंदा रक्षाबंधनचा मुहूर्त हा दिनांक ३० ऑगस्ट २०२३ रोजी रात्री ९.०१ ते दिनांक ३१ ऑगस्ट २०२३ सकाळी ७.०४ मिनिटांपर्यंत आहे. रक्षाबंधनासाठी विविध तर्ककुतर्क लावून काही मंडळींनी सामाजिक संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला दिसून येत आहे. मात्र विचारीत न होता “शास्त्रात रुढीर बलियासी ” या उक्तीप्रमाणे रूढी परंपरेला मान देऊन पारंपारिक पद्धतीने रक्षाबंधन करणे योग्य ठरेल. दुसरा पर्याय मुहूर्त ठरेल तो यावर्षी रात्री नऊ नंतर सुरू होऊन दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजेपर्यंत आहे. भाऊ बहिणीच्या नात्याचा हा सण आनंदाने साजरा करताना कोणत्याही प्रकारच्या किंतु परंतु न ठेवता श्रद्धा भक्ती आणि हिंदू धर्म परंपरा याची वाढ होत राहील व त्यातून आनंदही उत्पन्न होत राहील अशा भावनेने आपल्या रूढी परंपरेप्रमाणे रक्षाबंधन करावे. मात्र ज्यांना शंका आहे त्यांनी जरूर रात्री नऊ नंतर रक्षाबंधन करावे .
– रवींद्र पाठक, गुरुजी,ठाणे
हे ही वाचा:
Asia cup 2023, रोहित शर्माचा उत्तराधिकारी नक्की कोण? हार्दिक पांड्या की जसप्रीत बुमराह…