हिंदू पंचांगानुसार फाल्गुन शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला होलिका दहन म्हणजेच होळी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. होलिका दहन हे वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून साजरा करण्यात येतो. होलिका दहनाच्या वेळी अगणित अनेक गोष्टी अर्पण करण्याची परंपरा आहे. होलिका दहनाच्या वेळी महाराष्ट्रात पुरणपोळीच्या नैवेद्यासह नारळ अर्पण करण्याची प्रथा आहे. खरं तर हिंदू धर्मात नारळ म्हणजे श्रीफळाशिवाय कुठलंही शुभ कार्य किंवा पूजा होत नाही. पण होलिका दहनाच्या वेळी अग्नित नारळ का अर्पण करतात? याचे कारण माहित आहे का? सविस्तर माहिती जाणून घेऊया.
नारळाला असलेले डोळे हे त्रिगुणांचे प्रतीक मानले जात असल्याने त्याला पूजेत अतिशय महत्त्व आहे. नारळाला कामधेनू तर नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष असं म्हटलं जातं. दक्षिण भारतात नारळाला हार सोना म्हटलं जातं. होलिका दहनाचे अग्नि अत्यंत पवित्र आध्यात्मकमध्ये अतिशय पवित्र मानला गेला आहे. होलिका दहनाच्या अग्नित जी काही वस्तू अर्पण केली जाते त्याच्या प्रभावाने अनेक शुभ फळ प्राप्तीसाठी होतो अशी धर्मशास्त्रात मान्यता आहे.
अशा वेळी होलिका दहनाच्या आगीत नारळ अर्पण केल्यास घराची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत मिळते. कर्जाचा बोझा दूर होतो. त्याशिवाय नारळाबाबत अशी एक समजूत आहे की नारळाला अगणित जाळल्याने ते व्यक्तींचे आणि त्याच्या कुटुंबातील सर्व सदस्यांचे आशीर्वाद प्राप्त होतो. होलिका दहनाच्या दिवशी कापूर टाकून नारळ जाळल्यास तुमची अनेक दिवसांपासून रखडलेली कामे मार्गी लागतात असं म्हटले जाते.
यावर्षी पंचांगानुसार १३ मार्च २०२५ ला रात्री ११.२६ वाजल्यापासून ते रात्री १२.३० वाजेपर्यंत पूजा करण्याचा शुभ मुहूर्त आहे. या दिवशी घरातून एक नारळ हातात धरून शेंडीबाहेर असेल असाच हातात धरावा. तसेच तो नारळ संपूर्ण घरात फिरवून होळीच्या दहनाच्या मुहूर्तावर अग्नित अर्पण करावा.