Saturday, April 20, 2024

Latest Posts

घरच्या घरी बनवा, बेक्ड सुरण फलाफल विथ बीटरूट हमस

सुरण हे आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहे. सुरणामुळे आपल्या शरीराला अनेक चांगले फायदे होतात. सुरण हे आपल्याला कोणत्याही ऋतूत सहज सापडतात. आपण सुरणाची भाजी कधीही बनवून खाऊ शकतो. सुरणाची भाजी अत्यंत पोषक आहे.

सुरण हे आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहे. सुरणामुळे आपल्या शरीराला अनेक चांगले फायदे होतात. सुरण हे आपल्याला कोणत्याही ऋतूत सहज सापडतात. आपण सुरणाची भाजी कधीही बनवून खाऊ शकतो. सुरणाची भाजी अत्यंत पोषक आहे. परंतु सुरण खाण्यास अनेक जण नाक मुरडतात. पण तुम्हाला माहीत आहे का सुरण खाण्याचे खूप फायदे आहेत. सुरण हे मधुमेह असलेल्यांनी खाल्ले पाहिजे कारण हे रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करतात. पण अनेक जण सुरणाची भाजी खाण्यास नकार देतात. म्हणूनच आम्ही तुमच्या साठी घेऊन आलो आहोत खास बेक्ड सुरण फलाफल विथ बीटरूट हमस.

तुम्हाला सर्वांना तर ठाऊकच असेल की बीट हे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. आपण सॅलेड मधून बीट हे खात असतोच. बीटरूटचे नियमित सेवन केल्याने मेंदूचे कार्य सुधारते. बीट हे रक्तवाढीसाठी सुद्धा चांगले असते. चला तर मग बघूया आमची खास रेसिपी.

बीटरूट हमास साठी बनवण्यासाठी लागणारे साहित्य –

बीट १, रात्रभर भिजवलेले काबुली चणे १/२ कप, १ ग्लास पाणी, चवीनुसार मीठ , ११/२ चमचे तीळ, १ छोटा चमचा लसूण, २ चमचे ऑलिव्ह ऑइल, १/४ चमचे काळी मिरी पावडर, १ माध्यम आकाराच्या लिंबाचा रस.

बीटरूट हमास बनवण्यासाठीही कृती –

सगळ्यात आधी तुम्ही बीट स्वच्छ धावून घ्या. धुतल्यानंतर त्याची सालं काढा. त्यांनतर तुमच्याकडे असलेला एक कुकर घ्या त्या कुकर मधून बारीक चिरलेला बीट शिजवून घ्या. काबुली चण्यामध्ये चवीनुसार मीठ व पाणी घालून कुकरमध्ये पाच ते सहा शिट्या होईपर्यंत मऊ शिजवून घ्या. त्यानंतर तुम्ही शिजवलेले बीट व काबुली चणे थंड करत ठेवून द्या. त्यानंतर गॅस लावून साधारण १ ते २ मिनिटे तीळ भाजून घ्या. ते तीळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्या आणि त्या बरोबर ऑलिव्ह ऑइल वाटून त्याची पेस्ट तयार करून घ्या. त्यांनतर त्यामध्ये बिट, काबुली चणे, लसूण, काळी मिरी पावडर, लिंबू रस घालून बारीक पेस्ट तयार करून घ्या. अश्याप्रकारे तुमचे बीटरूट हमस तयार होईल.

सुरण टार्टस बनवण्यासाठी लागणारे साहित्य –

गव्हाचे पीठ २ कप, साले काढून बारीक चिरलेले १ कप सुरण, २ चमचे कलोंजी, १ चमचा बेकिंग पावडर, २ किंवा ३ चमचे तूप, दही ३/४ चमचे, चवीनुसार मीठ, १/४ चमचे काळी मिरी पावडर, आवश्यकतेनुसार पाणी, आणि किंचित ऑलिव्ह ऑइल.

सुरण टार्टस बनवण्यासाठीची कृती –

सर्वप्रथम सुरण कापण्यासाठी तुमच्या हाताला थोडे मीठ व तेल चोळून घ्या. सुरणाचे बारीक तुकडे करा आणि त्याला शिजवून घ्या. त्यांनतर ते बारीक बारीक तुकडे मिक्सरमधे टाकून त्याची पेस्ट करा. त्यानंतर तुमच्याकडे असलेले एक पातेले घ्या. ते गॅसवर ठेऊन त्यात गव्हाचे पीठ आणि तूप टाकून गरम करा. त्यानंतर त्यात मीठ, काली मिरी पावडर, बेकिंक पावडर, दही, कलोंजी आणि सुरणाची पेस्ट घाला आणि गटात पीठ मळून घ्या. तुमच्या आवश्क्तेनुसार पाण्याचा वापर करा. साधारण अर्धा तास पीठ भिजू द्या. त्यानंतर ओव्हन १८०० पर्यंत गरम करा. थोड्याश्या ऑलिव्ह ऑईलने सहा मिनी टार्ट मोल्ड ब्रश करून घ्या. तुम्ही पीठ या मोल्डमध्ये पसरवून घ्या आणि ते कुरकुरीत होण्यासाठी साधारण वीस किंवा पंचवीस मिनिटे बेक करा. त्यानंतर सुरण टार्ट ओव्हन मध्ये काढून ठेवा आणि त्याला पूर्णपणे थंड होऊ द्या. अशाप्रकारे तुमची स्पेशल डिश बेक्ड सुरण फलाफल विथ बीटरूट हमस तयार होईल.

हे ही वाचा : 

मोरूची मावशी फेम विजय चव्हाण यांचा लेकही आहे उत्तम अभिनेता, ‘या’ मालिकेत केलंय काम

Khupte Tithe Gupte च्या पहिल्या भागात कोण येणार पाहिलं? EKNATH SHINDE की RAJ THACKERAY?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो कर.

Latest Posts

Don't Miss