दररोज नवनवीन पदार्थ काय करायचे हा प्रश्न घरातल्या गृहिणीला नेहमीच पडत असतो. अनेकदा संध्याकाळच्या वेळेला कुरकुरीत खाण्याचीदेखील इच्छा होते. मग शेवपुरी, भेळ खाऊनही कंटाळा येतो. अशावेळी आपण नवीन काहीतरी रेसिपी नक्की ट्राय करू शकतो. सध्या थंडीचे दिवस आहेत आणि बाजारात मटारही मोठ्या प्रमाणात विकायला आले आहेत. मटार कचोरी ही एक खमंग आणि चविष्ट डिश आहे जी नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या चहासोबत खाण्यासाठी उत्तम पर्याय आहे. ताजे आणि गोड मटारपासून आपण मटार कचोरी कशी बनवायची याची सोपी रेसिपी पाहूयात.
मटार कचोरी रेसिपी (Matar Kachori Recipe in Marathi)
साहित्य:
कचोरीसाठी:
- २ कप मैदा
- २ टेबलस्पून रवा (पराठा कुरकुरीत होण्यासाठी)
- ३ टेबलस्पून तेल (मोहनसाठी)
- मीठ चवीनुसार
- पाणी आवश्यकतेनुसार (मळण्यासाठी)
मटार सारणासाठी:
- १ कप हिरवे मटार (उकडलेले)
- १ टेबलस्पून तेल
- १/२ टीस्पून जिरे
- १/२ टीस्पून हळद
- १/२ टीस्पून धणे पावडर
- १/२ टीस्पून जिरं पावडर
- १/२ टीस्पून लाल तिखट
- १/२ टीस्पून गरम मसाला
- १/२ टीस्पून आमचूर पावडर (ऐच्छिक)
- मीठ चवीनुसार
- १ टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर
कृती:
- एका भांड्यात मैदा, रवा, मीठ आणि तेल एकत्र करून मिक्स करा.
- आवश्यकतेनुसार पाणी घालून घट्टसर आणि मऊसर पीठ मळा.
- झाकून ३० मिनिटे बाजूला ठेवा.
- उकडलेले मटार मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्या.
- एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यात जिरे टाका.
- नंतर हळद, धणे पावडर, जिरं पावडर, लाल तिखट, गरम मसाला आणि मीठ घाला.
- वाटलेले मटार टाकून ५-७ मिनिटे परतून घ्या.
- शेवटी आमचूर पावडर आणि कोथिंबीर टाकून मिक्स करा. सारण तयार आहे.
- मळलेल्या पीठाचे छोटे गोळे बनवा आणि पुरीसारखा लाटून घ्या.
- १-२ टीस्पून सारण ठेवा आणि कडा एकत्र करून बंद करा.
- हलक्या हाताने दाबून थोडी सपाट करा.
- मध्यम आचेवर तेल गरम करून तयार कचोर्या कुरकुरीत होईपर्यंत तळा.
- गरमागरम मटार कचोरी चिंच-गूळ चटणी किंवा हिरव्या चटणीसोबत सर्व्ह करा!
हे ही वाचा :
CIDCO च्या २६००० घरांच्या अर्जदारांची यादी ३ फेब्रुवारीला होणार प्रकाशित; सोडत कधी होणार जाहीर?