क्रिमी ग्रीन पास्ता लहान मुलांसाठी पौष्टिक आणि स्वादिष्ट आहे. यामध्ये विविध पत्तेदार भाज्या आणि दूध यांचा समावेश असतो, ज्यामुळे ते लहान मुलांसाठी पौष्टिक, हायप्रोटीन आणि फायबर्ड भरपूर असते.ज्यामुळे मुलांना प्रोटीन, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम मिळते, जे हाडांच्या वाढीसाठी महत्त्वाचे आहे.क्रिमी ग्रीन पास्ता लहान मुलांसाठी हलके आणि पचायला सोपे आहे. ग्रीन भाज्यांमध्ये फायबर्स असतात, ज्यामुळे पचनक्रिया उत्तम होते. क्रिमी ग्रीन पास्ता बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय आहे हे जाणून घेऊया.
क्रिमी ग्रीन पास्ता बनवण्याचे साहित्य :
> उकडलेला वाटाणा
> लसूण
>हिरवी मिरची
>भिजवलेले काजू
>भिजवलेले अक्रोड
>भिजवलेले शेंगदाणे
>पनीर
>कांदा पात
>कोथिंबीर
>चीज
>मीठ
>पाणी
>बर्फाचे तुकडे
>तेल
>पास्ता पाणी
>चिली फ्लेक्स
क्रिमी ग्रीन पास्ता बनवण्याची कृती :
क्रिमी ग्रीन पास्ता बनवण्यासाठी सर्वात पहिले एका भांड्यात पाणी घेऊन त्याला एक उकळी आणा सोबतच त्यात चिमूटभर मीठ आणि एक चमचा तेल टाका. मग त्या तुम्हाला हवा तेवढा पास्ता घालून उकळून घ्यावे. नंतर एका मिक्सरच्या भांड्यात उकडलेला वाटाणा, लसूण, हिरवी मिरची, भिजवलेले काजू, भिजवलेले अक्रोड, भिजवलेले शेंगदाणे, किसलेले पनीर, कांदा पात, कोथिंबीर, चीज, मीठ, बर्फाचे तुकडे चांगले सगळे एकजीव बारीक करून घ्या. नंतर पॅनमध्ये तेल गरम करून तयार पेस्ट त्यात टाका. ती पेस्ट चांगली भाजून झाल्यावर त्यात उकडलेला पास्ता टाका. नंतर पास्ता पाणी टाका. तयार क्रिमी ग्रीन पास्ता सर्व्ह करू शकता.
हे ही वाचा:
लाचखोर वनक्षेत्रपालाच्या घराची झडती; 57 तोळं सोनं अन् 1 कोटी 31 लाखांची कॅश
“आता खरी मजा आहे”, Manoj Jarange Patil यांची Devendra Fadnavis यांच्यावर टीका