Tuesday, June 6, 2023

Latest Posts

पालकची भाजी आवडत नाही? मग पालक चा हा पदार्थ नक्की ट्राय करा.

पालक हि भरपूर गुणधर्मी असणारी पाले भाजी आहे. सगळ्याच पाले भाज्या खाणं हे अत्यंत गरजेचं आहे. पाले भाज्या खाल्याने आपलं शरीर निरोगी बनते. पाले भाज्या ह्या गुणकारी असतात . पाले भाज्यांमधून आपल्या शरीराला उपयुक्त असे पोषक घटक मिळतात.

पालक हि भरपूर गुणधर्मी असणारी पाले भाजी आहे. सगळ्याच पाले भाज्या खाणं हे अत्यंत गरजेचं आहे. पाले भाज्या खाल्याने आपलं शरीर निरोगी बनते. पाले भाज्या ह्या गुणकारी असतात . पाले भाज्यांमधून आपल्या शरीराला उपयुक्त असे पोषक घटक मिळतात. काही लोक मिटक्या मारत पाले भाजी खातात तर काही जण पाले भाजीच नाव सुद्धा काढलं तरी नाक मुरडतात. पालक भाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं त्यामुळे आपली हाडे मजबूत बनतात आणि आपल्याला कोणत्याही प्रकारच्या हाडांच्या समस्यांना सामोरे जावे लागत नाही. कॅल्शिअम सोबतच त्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन (Protein ), लोह, आयर्न (Iron ), व्हिटॅमिन ए (Vitamin A), व्हिटॅमिन सी (Vitamin C) यांचे योग्य प्रमाण असते. त्यामुळे आपल्याला कोणताही आजार होत नाही. आपण पालकाचे अनेक पदार्थ बनवतो जसे कि पालक पनीर, पालक राईस, पालकाची भाजी, पालक सूप पण तुम्ही कधी पालक वडी बद्दल ऐकले आहे का? जर तुम्हाला किंवा तुमच्या मुलांना पालकाची भाजी आवडत नसेल तर तुम्ही हि नवीन रेसिपी नक्कीच करू बघू शकता. तुमच्या मुलांना व तुमच्या कुटुंबियांनाही ही पालक वडी नक्कीच आवडेल. ही पालक वडी चवीला उत्कृष्ठ असून अतिशय पौष्टीक आहे. तुम्ही नाश्त्याला किंवा जेवणासोबत या वडीचा आस्वाद घेऊ शकता.

पालकाची वडी बनविण्यासाठी लागणारं साहित्य:

पालक, बेसन, तांदळाचे पीठ, आलं लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट, हिंग, हळद, लाल तिखट, धणे पूड, गरम मसाला, ओवा, सफेद तीळ, मीठ, तेल,

पालकाची वडी बनविण्यासाठी लागणारी कृती:

पालकाची वडी बनविण्यासाठी सर्वप्रथम पालक एकदम स्वच्छ धुवून घ्या आणि त्यातले पाणी काढून टाका. त्यानंतर पालक बारीक चिरून घ्या. आणि त्यात आलं लसूण आणि हिरव्या मिरचीची पेस्ट त्याचबरोबर बेसन, तांदळाचे पीठ, अगदी थोडेसे हिंग, हळद, लाल तिखट, धणे पूड, गरम मसाला, ओवा, तीळ आणि चवीनुसार मीठ घालून चांगल्याप्रकारे त्याचे मिश्रण बनवून घ्या. चांगले मिक्स करून झाल्यानंतर त्यात थोडेसे पाणी घाला आणि पीठ घट्ट तयार करून घ्या. त्यानंतर हाताला तेल लावा तसेच तुमच्याकडे असलेली चाळण घेऊन त्या चाळणीला तेल लावून घ्या. पालकाच्या पिठाचे लांब गोळे बनवा. आणि त्या तेल लावलेल्या चाळणीवर ठेवा. त्यानंतर तुम्ही पालकाच्या मिश्रणाला वाफवून घ्या. वाफवून झाल्यानंतर ते पालकाचे मिश्रण थंड करत ठेवा आणि त्यानंतर त्याची वडी कट (Cut) करून घ्या. त्यानंतर गॅस वर कढई ठेवून त्यामध्ये टाळण्यासाठी तेल टाकून घ्या आणि त्या तेलात वड्या सोडून कुरकुरीत टाळून घ्या. अश्याप्रकारे तुम्ही खमंग पालकाची वडी तयार होईल.

हे ही वाचा:

छगन भुजबळांनी उपस्थित केला एक सवाल ?

तुषार भोसले यांनी त्र्यंबक विषयावर केले मोठे वक्तव्य

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss