पेरूमध्ये व्हिटॅमिन ए असते. पेरू डोळ्यांच्या विविध समस्यांपासून दूर ठेवतो. पेरूमध्ये असलेले फायबर बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम देते. पेरूमध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, व्हिटॅमिन सी यासह विविध गुणधर्म असतात. पेरूच्या जादुई गुणधर्मांमुळे तुम्हाला अनेक आजारांपासून मुक्ती मिळू शकते. रोज एक पेरू खाल्ल्याने पोटॅशियमची पातळी वाढते, असे तज्ञ म्हणतात. त्यामुळे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते. पेरू मध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडंट असतात. ज्यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. मात्र काही लोकांनी पेरूचे सेवन करणे टाळले पाहिजे यामुळे त्यांना शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. आपल्या सर्वांच्या रोजच्या आहारात फळांचा समावेश करणे गरजेचे आहे. फळांमध्ये अनेक प्रकारचे व्हिटॅमिन्स असतात जे शरीरासाठी फायदेशीर ठरतात.
तसेच आपल्याला निरोगी राहण्यासाठी फळे खाणे अत्यंत आवश्यक आहे. फळांमुळे आपल्या शरीराला ऊर्जा मिळते. फळे खात असतांना पेरूचे सेवन करणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत आरोग्यदायी मानले जाते. पेरूचे अनेक फायदे आहेत जसे पेरू खाल्ल्यामुळे वजन लवकर कमी होते. पेरू हा कॅल्शियमचा एक चांगला स्त्रोत तर आहेच पण त्यामध्ये फायबरचे प्रमाण असते त्यामुळे तुमचे पोट दीर्घकाळ भरलेले राहते. त्यासोबतच पेरू मध्ये असलेले पोषक तत्व तुम्हाला अनेक समस्यांपासून दूर ठेवू शकतात पण काही लोकांनी पेरूचे सेवन करणे टाळले पाहिजे. जर तुम्ही पेरूचे जास्त प्रमाणात सेवन केले तर त्यामुळे अनेक समस्या उद्भवू शकतात.
एलर्जी होऊ शकते : अनेक लोक हे पेरू खाल्ल्यानंतर ऍलर्जीची तक्रार करतात. अशा लोकांना पेरू खाल्ल्यानंतर खाज येणे, पुळ्या येणे, सूज येणे अशा तक्रारी असू शकतात. जर तुम्हाला पेरू खाण्याची एलर्जी असेल तर तुम्हीही पेरूचे सेवन करणे टाळा.
लो बीपी : तुम्हाला कमी रक्तदाबाचा त्रास असेल किंवा तुम्ही जर आधीच रक्तातील साखर कमी करण्याचे औषधे घेत असाल तर अशा परिस्थितीत तुम्ही पेरूचे सेवन अजिबात करू नका जर तुम्ही पेरूचे सेवन केले तर पेरूमुळे तुमच्या समस्या वाढू शकतात. यामुळे रक्तातील साखरेची पातळी कमी होऊ शकते.
पचनासंबंधी समस्या : खरंतर पेरूमध्ये खूप जास्त प्रमाणात फायबर असते. यामुळे पेरूचे सेवन केल्याने पचन समस्या उद्भवू शकतात. ज्यामुळे अनेक समस्या तुम्हाला उदभवू शकतात. जसे पोट फुगणे, गॅस होणे, पोट खराब होणे, बद्धकोष्ठता इत्यादी समस्या उद्भवू शकतात.
त्वचेची जळजळ : पेरू किंवा पेरूचा अर्क खाल्ल्याने काही लोक त्वचेवर जळजळ झाल्याची तक्रार करू लागतात. मुख्यतः एक्झिमाने ग्रस्त असलेल्या लोकांनी अशा प्रकारच्या समस्या झाल्याचे सांगितले आहे.
गर्भधारणा आणि स्तनपान : जर महिला गर्भधारण करत असलं तर या दरम्यान किंवा स्तनपान करत असलं तर महिलांनी पेरूचे सेवन टाळावे. जर तुम्ही पेरूचे जास्त सेवन केले तर गर्भधारण स्त्रीला तिच्या अनेक समस्यांमध्ये लक्षणीय वाढ होऊ शकते.
हे ही वाचा:
Raj Thackeary यांनी केला हल्लाबोल, उद्धव ठाकरेंच्या हातून कधी पैसा सुटत नाही…
Kalyan ग्रामीणमध्ये तिरंगी की दुरंगी लढत? Subhash Bhoir | Raju Patil Interview | MNS | Raj Thackeray