Ganeshostav 2023 :- संपूर्ण महाराष्ट्रभर गणेशोत्सव काळात आनंद आणि चैतन्याचे वातावरण असते. यंदा १९ सप्टेंबरपासून गणेश उत्सवाला सुरुवात होणार आहे. यासाठी सगळीकडे विशेष तयारी केली जाते. ढोल ताशाच्या गजरात बाप्पाचे आगमन केले जात आहे. आगमन झाल्यानंतर पूजा करून नैवेद्य दाखवला जातो. या दिवशी बाप्पाच्या आवडीचे मोदक बनवले जातात. प्रत्येक घराघरात या दिवशी बाप्पाला २१ मोदकांचा नैवेद्य दाखवला जातो. आता पर्यंत तांदळाचे उकडीचे मोदक, खोबऱ्याचे मोदक खाल्ले असतील. पण आज आपण पुरणाचे मोदक कसे बनवायचे याची रेसिपी पाहणार आहोत.
साहित्य :-
तांदळाचे पीठ(१ वाटी)
मीठ (चवीनुसार)
उकळते पाणी
तेल किंवा तूप
गूळ (अर्धा वाटी)
पाणी
चणा डाळ (१ वाटी)
किसलेला नारळ (आवश्यकतेनुसार)
वेलची पावडर (चवीनुसार)
तूप
कृती:-
पुरणाचे मोदक बनवण्यासाठी सर्वप्रथम कुकरमध्ये पाणी घालून घ्या. नंतर त्यात थोडा वेळ भिजवून ठेवलेली चणा डाळ टाका. कुकरचे झाकण लावून झाल्यानंतर गॅस चालू करून कुकरच्या ४ शिट्या करून घ्या. त्यानंतर पाच मिनिट कुकर मंद आचेवर ठेवा. थोड्या वेळाने कुकर थंड झाल्यानंतर उघडा. त्यानंतर एका पॅनमध्ये गुळ टाकून वितळून घ्या. गूळ वितळल्यानंतर ते बाजूला ठेवून द्या.पुन्हा दुसरा एक पॅन घेऊन त्यात खोबर टाकून ते भाजून घ्या आणि त्यात शिजवलेली डाळ मिक्स करा. आता हे मिश्रण घट होई पर्यंत मिक्स करत राहा. त्यात चवीनुसार वेलची पावडर, तूप, आणि वितळलेले गुळ टाकून पुन्हा नीट मिक्स करून घ्या. यामध्ये डाळ नीट मिक्स करून घ्या. त्यानंतर ते थंड करण्यासाठी ठेवा.
आता पीठ मळून घेण्यासाठी एका खोलगट पातेल्यात मीठ आणि पाणी टाकून घ्या. त्या पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात तांदुळाचे पीठ टाकून नीट मिक्स करून घ्या. थंड झाल्यावर त्यात १ चमचा तेल घालून पीठ मऊ होईपर्यंत मळून घ्या. पीठ मळून झाल्यानंतर त्याचे छोटे गोळे करून घेऊन मोदकाची पारी तयार करा.पारी करून झाल्यानंतर त्यात सारण भरून घ्या. मोदक करून झाल्यानंतर उकड काढण्यासाठी ठेवत असलेल्या भांड्यात १० ते १२ मिनिटे ठेवत वाफवून घ्या. अशाप्रकारे तुमचे पुरणापासून बनवलेले उकडीचे मोदक तयार झाले.
हे ही वाचा:
‘फक्त मराठी सिने सन्मान सोहळा २०२३’ दिमाखात संपन्न, ‘वाळवी’ ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या विधानावरून राजकारण तापण्याची शक्यता