Green Garlic Thecha Recipe : हिरव्या मिरचीच्या ठेच्याप्रमाणेच हिरव्यागार लसणीच्या पतीचा ठेचा घरी नक्की करून बघा. जाणून घ्या याची रेसिपी.
Green Garlic Thecha Recipe : लसणाच्या पातीचा ठेचा हा एक पारंपारिक आणि अत्यंत आरोग्यदायी पदार्थ आहे. याचे अनेक फायदे आहेत आणि भारतीय पदार्थांमध्ये याचा वापर विविध प्रकारे केला जातो. लसणाच्या पातीमध्ये अँटीऑक्सिडन्ट्स, अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म असतात.लसणाच्या पातीमध्ये शरीरातील साखरेची पातळी नियंत्रित करण्याचे गुणधर्म असतात.लसणाच्या पातीचा ठेचा विविध शारीरिक आजारांवर उपयोगी पडतो, ज्यात जळजळ, कफ, आणि पचनासंबंधी समस्या समाविष्ट आहेत.लसणाच्या पातीचा ठेचा एक पौष्टिक, स्वादिष्ट आणि आरोग्यदायी पदार्थ आहे. त्याचा उपयोग पचन, ह्रदय, त्वचा, आणि शारीरिक इतर आरोग्य समस्यांवर चांगला परिणाम करतो. याला विविध पदार्थांमध्ये मिसळून वापरता येते आणि ते आपल्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरते. विशेष करून महाराष्ट्रीयन जेवणात तोंडी लावणे हा प्रकार असतो त्यामुळे लसणाच्या पातीचा ठेचा योग्य ठरू शकतो.
लसणीच्या पातीचा ठेचा बनवण्याचे साहित्य :
> ओल्या लसणाची जुडी – १
> तेल – १/४ कप
> धने – १/२ टेबलस्पून
> जिरे – २ टेबलस्पून
> शेंगदाणे – १/३ कप
> हिरव्या मिरच्या – १० ते १२ (उभ्या चिरलेल्या)
> कोथिंबीर – १/४ कप (बारीक चिरलेली)
> मीठ
लसणीच्या पातीचा ठेचा बनवण्याची कृती :
लसणाच्या पातीतील लसूण आणि त्याची हिरवी पात अशा गोष्टी वेगळ्या करून स्वच्छ धुवून घेऊन बारीक चिरून घ्यावे. एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यात धने, जिरे, शेंगदाणे, उभ्या चिरलेल्या मिरच्या आणि पातीची बारीक चिरून घेतलेले लसूण घालावा. हे सगळ्या गोष्टी एकत्रित करून चमच्याने चांगले मिक्स करून घ्यावे. ४ ते ५ मिनिटे व्यवस्थित शिजवून घ्यावे. त्यानंतर त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर आणि लसणाची हिरवीगार पात घालावी.
हे ही वाचा:
मोठ्या आकाला वाचवण्यासाठी छोट्या आकाचा एन्काऊंटर करणार का ?
भारतीय क्रिकेटप्रेमींना मोठा धक्का ! सिडनी कसोटीपूर्वी गोलंदाज जखमी तर संघात कोणाला मिळणार जागा ?