spot_img
spot_img

Latest Posts

नाश्त्याला करा, गुजराथी इन्स्टंट हांडवो

गुजरात हे पर्यटनासाठी खूप प्रसिद्ध आहे. तसेच तिथले पदार्थ ही तितकेच प्रसिद्ध आहेत. गुजराती पदार्थ हे फक्त गुजरातमध्येच नाही तर, संपूर्ण भारतात चवीने खाल्ले जातात.

गुजरात हे पर्यटनासाठी खूप प्रसिद्ध आहे. तसेच तिथले पदार्थ ही तितकेच प्रसिद्ध आहेत. गुजराती पदार्थ हे फक्त गुजरातमध्येच नाही तर, संपूर्ण भारतात चवीने खाल्ले जातात. जलेबी, फाफडा, ढोकळा आणि खांडवी हे पदार्थ तर प्रसिद्ध आहेतच, पण यासह हांडवो हा पदार्थ ही देखील तितक्याच आवडीने खाल्ले जातात. इन्स्टंट हांडवो हा पदार्थ करण्याची प्रक्रिया खूप सोपी आणि झटपट आहे. जर आपल्याला इन्स्टंट आणि झटपट ही रेसिपी करायची असेल तर, रव्यापासून केलेले हांडवो तयार करा. तुम्ही ही रेसिपी नाश्त्यामध्ये करून खाऊ शकता. चला तर मग इन्स्टंट हांडवो ही रेसिपी कशी तयार करायची हे पाहूयात.

साहित्य –
१ कप रवा
१ कप बेसन
फेटून घेतलेलं दही
किसलेला गाजर
बारीक चिरलेला कोबी
बारीक चिरलेली सिमला मिरची
शेंगदाण्याच कूट
बारीक चिरलेली हिरवी मिरची
मोहरी
१ चमचा हळद
२ चमचा लाल तिखट
१ चमचा धणे पूड
कडीपत्ता
१ चमचा आल्याची पेस्ट
१ चमचा इनो
मीठ

कृती –
सर्वप्रथम एका वाडग्यात एक कप रवा, एक बेसन आणि फेटलेले दही घालून मिक्स करा. गरजेनुसार त्या मिश्रणात तुम्ही पाणी मिक्स करू शकता. त्यानंतर त्या मिश्रणात चिमुटभर हळद , लाल तिखट, धने पुड आणि आल्याची पेस्ट घालून ते मिश्रण एकजीव करून घ्या. त्यात नंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करा. त्यात मसाले मिक्स केल्यानंतर त्यात किसलेला गाजर, बारीक चिरलेला कोबी, चिरलेला सिमला मिरची आणि शेंगदाण्याचे कूट घालून ते मिश्रण एकजीव करा. जर मिश्रण जास्त घट्टसर वाटत असेल तर, त्यात गरजेनुसार पाणी टाकुन मिक्स करा. मिश्रण एकजीव केल्यानंतर त्यावर १० मिनिटांसाठी झाकण ठेऊन ते मिश्रण बाजूला ठेवा. तयार मिश्रणामध्ये एक चमचा इनो घालून ते मिक्स करा. १० मिनिटानंतर गॅसवर पॅन गरम करण्यासाठी ठेवा. त्यानंतर पॅनमध्ये २ ते ३ चमचे तेल घाला. त्यात तीळ आणि मोहरी घाला. गरम तेलात अर्धा चमचा मोहरी, तीळ, कडीपत्ता, जिरं घालून गॅस मंद आचेवर ठेवा, म्हणजे ते मसाले जळणार नाहीत. त्यानंतर १ चमचा मिश्रण घालून पसरवा. ते मिश्रण थोड जाडसर ठेवा, ते जास्त पसरवू नका. पॅनवर ५ मिनिटांसाठी झाकण ठेवा. मंद आचेवर इन्स्टंट हांडवो शिजवून घ्या. ५ ते ८ मिनिटानंतर ते झाकण काढा व दोन्ही बाजूने हांडवो खरपूस भाजून घ्या. तयार झालेला हांडवो एका ताटात काढून घ्या. अशा प्रकारे हांडवो खाण्यासाठी तयार आहे.

हे ही वाचा: 

गणपतीच्या प्रसादात पहिला मान खोबऱ्याच्या खिरापतीचा

Consume this substance to digest food : अन्न पचवण्यासाठी ‘या’ पदार्थाचे करा सेवन

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss