Saturday, April 20, 2024

Latest Posts

संध्याकाळच्या वेळेस करा ‘हा’ पौष्टीक नाश्ता, जाणून घ्या रेसिपी

लहान मुले दमून खेळून संध्याकाळी शाळेतून घरी येतात तसेच मोठी माणसंही कामावरून घरी येतात. तेव्हा त्यांना प्रचंड भूक लागलेली असते. काही वेळेस आपल्याला सतत तोच नाश्ता करून खूप कंटाळा येतो. संध्याकाळी घरी आल्यावर आपल्याला जेवणाऐवजी काही चमचमीत पदार्थ खावेसे वाटतात

लहान मुले दमून खेळून संध्याकाळी शाळेतून घरी येतात तसेच मोठी माणसंही कामावरून घरी येतात. तेव्हा त्यांना प्रचंड भूक लागलेली असते. काही वेळेस आपल्याला सतत तोच नाश्ता करून खूप कंटाळा येतो. संध्याकाळी घरी आल्यावर आपल्याला जेवणाऐवजी काही चमचमीत पदार्थ खावेसे वाटतात. परंतु घरच्या गृहिणींना सर्वात मोठा प्रश्न पडतो तो म्हणजे संध्याकाळी नाश्तासाठी काय करावे. त्यामुळे आम्ही तुम्हाला असा एक चमचमीत पदार्थ सांगणार आहोत जो आपल्या शरीरासाठी पौष्टीक देखील आहे हा पदार्थ म्हणजे मेथीचे पकोडे. तुम्हाला तर ठाऊकच असेल मेथी आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. काही वेळेस मुलं मेथीची भाजी खाण्यास टाळाटाळ करतात त्यामुळे तुम्ही त्यांना मेथीचे पकोडे बनवून देऊ शकता. पकोडे हा मुलांचा आवडीचा पदार्थ आहे त्यामुळे तो पदार्थ ते आवडीने खातील. त्याचबरोबर मेथी आपल्या आरोग्यासाठी अतिशय लाभदायक आहे. मेथीचे सेवन केल्याने आपल्याला गॅस आणि पोटाच्या अनेक समस्यांपासून वंचित राहतो. हिरवी मेथी खाल्ल्याने मुलांच्या पोटात झालेले जंत निघून जातात. मेथीचे पकोडे तुम्ही मुलांना सॉस सोबत खायला देऊ शकतात. तसेच मोठी माणसं हे मेथीचे कुरकुरीत पकोडे चहा सोबत खाऊ शकतात. चला तर मग जाणून घेऊया मेथीच्या पकोड्याची रेसिपी.

मेथीचे पकोडे बनविण्यासाठी लागणारे साहित्य –

बेसन १ कप
मेथी
काळी मिरी १ चमचा
चवीनुसार मीठ
धणेपूड १ चमचा
मोजक्या प्रमाणात बेकिंग सोडा
आवश्यकतेनुसार पाणी
तेल

मेथीचे पकोडे बनविण्यासाठीची कृती –

सर्वात आधी तुमच्याकडे असलेला एक बाउल घ्या. त्या बाऊलमध्ये बेसन घेऊन त्यात मीठ, काळी मिरी त्याचबरोबर धणेपूड घाला आणि चांगल्याप्रकारे मिक्स करून घ्या. त्यानंतर त्यात मेथीची पाने टाकून पाण्याच्या मदतीने पीठ तयार करून घ्या. नंतर त्यामध्ये बेकिंग सोडा टाका. तुमच्याकडे असलेली एक कढई घेऊन ती गॅसवर ठेवून गॅस पेटवा त्यानंतर त्यामध्ये तेल टाकून गरम करत ठेवा आणि त्यात थोडे थोडे पीठ टाकून पकोडे बनवा. अशाप्रकारे कुरकुरीत मेथीचे पकोडे तयार होतील.

हे ही वाचा : 

सीईटी परीक्षांचे निकाल जाहीर, प्रवेश फेरीचे वेळापत्रक होणार लवकरच जाहीर

१२ वी नंतर करा हा कोर्स; प्रवेश प्रक्रियेपासून करिअरच्या संधी पर्यंत मिळवा संपूर्ण महिती

अवघ्या काही तासांत लागणार HSC चा निकाल, विद्यार्थ्यांची उत्सुकता शिगेला

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .

Latest Posts

Don't Miss