थंडीच्या दिवसात गावभागात हुरडा खाण्याची प्रथा आहे. आता या हुरड्याला महाराष्ट्रभर मागणी आहे. तर याच हुरड्यापासून थालीपीठ बनवले जाते. थालीपीठमध्ये विविध डाळी टाकून सुद्धा चविष्ट थालीपीठ बनवतात. आज आपण हुरड्यापासून थालीपीठ कसे बनवायचे याची रेसिपी पाहूया.
हुरडा थालीपीठ रेसिपी
साहित्य:
1. ताजा हुरडा (ज्वारीची कोवळी कणसं) – १ कप
2. ज्वारीचे पीठ – १ कप
3. गव्हाचे पीठ – १/२ कप
4. बेसन – १/४ कप
5. कांदा (बारीक चिरलेला) – १
6. आलं-लसूण पेस्ट -१ चमचा
7. हिरव्या मिरच्या (बारीक चिरलेल्या) – २ ते ३
8. कोथिंबीर (बारीक चिरलेली) – २ चमचे
9. तीळ – १ चमचा
10. हळद – १/४ चमचा
11. तिखट – १ चमचा
12. मीठ – चवीनुसार
13. तेल – थालीपीठ भाजण्यासाठी
कृती:
1. हुरड्याला मिक्सरमध्ये घालून जाडसर वाटून घ्या.
2. एका मोठ्या भांड्यात ज्वारीचं पीठ, गव्हाचं पीठ, बेसन, वाटलेला हुरडा, कांदा, आलं-लसूण पेस्ट, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, तीळ, हळद, तिखट आणि मीठ घालून चांगलं मिक्स करा.
3. हळूहळू पाणी घालून मऊसर पीठ भिजवा.
4. तवा गरम करून त्यावर थोडंसं तेल लावा.
5. भिजवलेलं पीठ हाताने थापून तव्यावर पसरवा. (हाताला थोडं पाणी लावा जेणेकरून थापायला सोपं जाईल).
6. थालीपीठाला मध्यभागी एक छोटं छिद्र पाडा आणि त्यात थोडंसं तेल टाका.
7. दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्या.
8. गरमागरम हुरडा थालीपीठ लोणचं, दही किंवा तुपासोबत सर्व्ह करा.
टीप: हुरडा नसेल तर मका किंवा चणे याचा वापर करूनही ही रेसिपी बनवता येईल.
हे ही वाचा :
रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदाच्या नियुक्तीला नाराजी नाट्यामुळे स्थगिती
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .