spot_img
spot_img
Tuesday, September 26, 2023
spot_img
spot_img

Latest Posts

कधी कच्चा केळीची भाजी खाल्ली आहे का? जाणुन घ्या सोपी रेसिपी

केळ हे असे फळ आहे, जे तीनही ऋतूमध्ये उपलब्ध असते. लहानापासून ते मोठ्यापर्यंत केळी ही सर्वाना आवडतात. पण तुम्ही कधी केळीची भाजी खाल्ली आहे का?

केळ हे असे फळ आहे, जे तीनही ऋतूमध्ये उपलब्ध असते. लहानापासून ते मोठ्यापर्यंत केळी ही सर्वाना आवडतात. पण तुम्ही कधी केळीची भाजी खाल्ली आहे का? ज्या प्रमाणे पिकलेली केली खाल्याने आपल्याला जीवनसत्वे प्राप्त होतात तसेच कच्ची केली खाऊनही आपल्याला जीवनसत्वे प्राप्त होतात. कच्चा केळीपासून पौष्टिक तितकीच चविष्ट भाजी बनवता येते. कच्चा केळीची भाजी कशी बनवायची ती या रेसिपीतून आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग बघूया कच्चा केळीच्या भाजीची सोपी रेसिपी.

साहित्य –
कच्ची केळी २
तुरीची डाळ अर्धा वाटी
गूळ अर्धा वाटी
धने पूड (आवश्यकतेनुसार)
जिरे पूड (आवश्यकतेनुसार)
१ चमचा मेथी
लाल तिखट (आवश्यकतेनुसार)
कोथिंबीर
खोबरं १ वाटी
मीठ ( चवीनुसार)

कृती – सर्वप्रथम गॅस चालू करून. एका मोठ्या कढईत तुरीची डाळ नीट भाजून घ्या. त्यात एक चमचा मेथी घालून ते नीट परतून घ्या. त्यानंतर ही डाळ एका ताटात काढून घ्या. त्यानंतर कुकरमध्ये २ वाट्या पाणी घालून, ही डाळ चांगली शिजवा. कुकरला १ शिट्या झाल्यावर कुकर थंड करत ठेवावे. कच्च्या केळीचे देठ काढून घ्या. केळीसुद्धा कुकरमध्येच शिजवून घ्यावीत. नंतर केळीची सालं काढून त्याचे छोटे छोटे तुकडे करावेत . एका कढईत तेल गरम करत ठेवा. त्यात सुरुवातीला मोहरी तडतडल्यावर त्यात हिंग आणि थोडी हळद घालून केळीच्या तुकड्यांना फोडणी द्या. त्यात कुकरमध्ये शिजलेली डाळ घाला. त्यात चवीनुसार तिखट, मीठ आणि गूळ घाला. त्यानंतर त्यात धनेपूड आणि जिरेपूड सुद्धा घाला. गॅसवर डाळ मंद आचेवर शिजू द्या. त्यानंतर वरुन कोथिंबीर आणि खोबरं घालून ही कच्च्या केळीची भाजी सर्व्ह करा. तयार आहे पौष्टिक कच्च्या केळीची भाजी.

हे ही वाचा:

Kalachowki मधील Food Dudes मध्ये मिलतोय स्वादिष्ट Wefer Pav | Kurkure bhel, Melting sandwich…

Side effects of frozen foods फ्रोझन फूड हे आरोग्याचे शत्रू, जाणून घ्या काय आहेत घटक परिणाम

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss