Friday, March 29, 2024

Latest Posts

कैरीचा भात कधी खाल्लाय का? ही रेसिपी आवर्जून ट्राय करा

उन्हाळा सुरु झाला की आंब्यांना आणि कैरीला फार महत्व असते. अनेक जण आंब्याचे विविध पदार्थ तयार करून त्यावर ताव मारतात. आमरस पिणे हे तर उन्हाळ्यातील स्वर्गसुखच असते.

उन्हाळा सुरु झाला की आंब्यांना आणि कैरीला फार महत्व असते. अनेक जण आंब्याचे विविध पदार्थ तयार करून त्यावर ताव मारतात. आमरस पिणे हे तर उन्हाळ्यातील स्वर्गसुखच असते. आंब्याचे लोणचे, आंब्याचे विविध सरबत तसेच आंब्यापासून तयार केलेल्या मिठाई या सारख्या पदार्थांना प्रचंड मागणी असते. आंब्यांप्रमाणे कैरीचे देखील अनेक विविध प्रकार तयार केले जातात.

उन्हाळ्यात घरोघरी कैरीचं पन्ह, कैरीची डाळ तसेच कैरीचं लोणचं आणि चटण्या हमखास तयार केल्या जातात. परंतु तेच तेच पारंपरिक पदार्थ खाऊन प्रत्येकालाच कंटाळा येतो. त्यामुळेच आज तुमच्या साठी खास कैरी पासून तयार केलेल्या मसाले भाताची रेसिपी घेऊन आलो आहोत. कैरीचा भात ही अत्यंत प्रसिद्ध रेसिपी आहे. कैरीचा भात घरच्याघरी सहज तयार केला जाऊ शकतो. नारळ आणि लाल मिरच्यांसोबत कैरीचा चटकदारपणा असलेली ही रेसिपी स्पेशल उन्हाळ्यात तयार केली जाते. चला तर मग जाणून घेऊयात या स्पेशल चमचमीत भाताची सोप्पी रेसिपी.

कैरी भातासाठी लागणारे साहित्य –

कैरी आवश्यकतेनुसार
किसलेले नारळ १/२ कप
आवश्यकतेनुसार कढीपत्ता
आवश्यकतेनुसार लाल मिरची
बासमती तांदुळ १ कप
नारळाचे तेल १/२ कप
मोहरीच्या बिया १ चमचा
काळे जिरे १ चमचा
चणा डाळ १ चमचा
उडदाची डाळ १ चमचा
हळद
हिंग
कच्चे शेंगदाणे
पूड मेथीचे दाणे
गूळ
मीठ

कैरी भात बनवण्यासाठी पुढील कृती करावी –

एका पॅनमध्ये तेल घेऊन २ ते ४ लाल मिरच्या फ्राय करून घाव्यात. आता मिरच्या काढून त्याच पॅनमध्ये किसलेले सुके खोबरे घेऊन ३ ते ४ मिनिटे चांगले भाजून घ्यावे. गॅस बंद करून त्या लाल मिरच्या व भाजलेले खोबरे मिक्सरच्या भांड्यात घावे. आता मिक्सरच्या भांड्यात लाल मिरच्या, भाजलेले खोबरे, जिरे, भाजलेली मेथी पावडर, कैरी व गुळ घालून त्यात थोडसं पाणी टाकून सर्व सामग्रीची चांगली बारीक पेस्ट करून घ्यावी.आता पॅनमध्ये तेल घेऊन त्यात मोहरी, चणा डाळ, उडीद डाळ, शेंगदाणे, हळद, हिंग व कडीपत्ता घालावे व रंग ब्राऊन, गोल्डन होई पर्यंत चांगले फ्राय करावे. आता मिक्सरमध्ये बारीक केलेली पेस्ट पॅन मधील सामग्री एकत्र करून त्यात शिजवलेला भात घालून सर्व सामग्री चांगली मिक्स करून घ्यावी.

अशाप्रकारे आपला स्पेशल चमचमीत कैरी भात तयार आहे.

हे ही वाचा : 

त्र्यंबक ग्रामस्थांकडून पडदा टाकण्यात येत असतानाच, नितेश राणे पोहोचले मंदिरात केली महाआरती

आज संध्याकाळी अरविंद केजरीवाल होणार मुंबईत दाखल, या नेत्यांची घेणार भेट

Neeraj Chopra ने रचला जागतिक स्तरावर इतिहास

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss