Saturday, April 20, 2024

Latest Posts

तुम्ही कधी ‘Maggie Bhel’ खाल्ली आहे का ?

मॅगी हा लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत अगदी लोकप्रिय खाद्य पदार्थ आहे. मॅगी खाण्याची क्रेझ सर्वांमध्ये असते. मॅगीची विशेष गोष्ट म्हणजे ती अगदी कमी वेळात तयार होते. मॅगीपासून विविध अनोखे आणि चविष्ट प्रकार बनवले जातत.

मॅगी हा लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत अगदी लोकप्रिय खाद्य पदार्थ आहे. मॅगी खाण्याची क्रेझ सर्वांमध्ये असते. मॅगीची विशेष गोष्ट म्हणजे ती अगदी कमी वेळात तयार होते. मॅगीपासून विविध अनोखे आणि चविष्ट प्रकार बनवले जातत. आज आम्ही सुद्धा मॅगीपासून तयार झालेला एक अनोखा खाद्य प्रकार खास तुमच्या साठी घेऊन आलो आहोत. तुम्ही भरपूर मसाला मॅगी किंवा साधी मॅगी खाल्ली असेल.परंतु तुम्ही कधी मॅगी भेळ ट्राय केली आहे का? मॅगी भेळ स्नॅकसाठी एक उत्तम पर्याय आहे. ही चवीला ही खूप मसालेदार आणि कुरकुरीत असते.

घरात काही खायला नसेल तर आपण एका चुटकीतच मॅगी बनवतो आणि त्यावर ताव मारतो. प्रत्येकालाच मॅगी प्रचंड आवडते. भूक शांत करण्यासाठी मॅगी हा एक स्वत्त आणि मस्त पर्याय. परंतु नेहमी नेहमी तीच मॅगी खाऊन कंटाळा येतो म्हणूनच आज आम्ही मॅगी भेळ ची खास रेसीपी तुमच्या साठी घेऊन आलो आहोत. चला तर मग पाहुयात मसालेदार आणि कुरकुरीत मॅगी भेळ कशी तयार करावी.

मॅगी भेळ बनवण्यासाठी लागणारे साहित्य –

१ पॅकेट मॅगी
१ वाटी भाजलेले शेंगदाणे –
१ चीज क्यूब
१/२ काकडी
१ टोमॅटो
२ हिरवी मिरची
१/२ गाजर
१ चमचा कोथिंबीर
१/२ टीस्पून लाल तिखट
१/२ टीस्पून मॅजिक मसाला
१ टीस्पून रेड चिली सॉस
१ टीस्पून टोमॅटो सॉस
अर्धा कांदा
मीठ चवीनुसार
लोणीचा तुकडा

मॅगी भेळ बनवण्यासाठी पुढील कृती करावी –

मॅगी भेळ बनवण्यासाठी आधी मॅगी क्रश करून घ्यावी. मग एका कढईत लोणीचा तुकडा टाकून वितळवून घ्यावे. यानंतर त्यात मॅगी घालून साधारण १० मिनिटे तळून एका बाऊलमध्ये बाहेर काढून घयावे. नंतर कांदा, गाजर, काकडी, टोमॅटो, हिरवी मिरची, कोथिंबीर अशा सर्व भाज्या धुवून बारीक चिरून घ्याव्यात. त्यानंतर भाजलेल्या मॅगीमध्ये टोमॅटो सॉस आणि रेड चिली सॉस १-१ चमचा घालून चांगले मिक्स करावे.नंतर भाजलेले शेंगदाणे, मीठ, मॅगी मसाला आणि लाल तिखट घालावे.यासोबतच त्यात सर्व चिरलेल्या भाज्या घालून नीट मिक्स करून घावे.

अशा प्रकारे चवदार, चविष्ट, कुरकुरीत आणि मसालेदार मॅगी भेळ तयार आहे.

हे ही वाचा:

Coconut Water Face Spray ने करा नियमित Skin Care, त्वचा ही उजळेल…

South Actor Harish Pengan यांनी वयाच्या ४९ वर्षी घेतला अखेरचा श्वास

संजय शिरसाट यांना पोलिसांकडून दिलासा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss