spot_img
Monday, January 20, 2025

Latest Posts

Healthy Christmas Cake Recipe : ना मैदा, ना साखर; बनवा घरच्याघरी ख्रिसमस स्पेशल प्लम केक

ख्रिसमस जवळ येतच आहे आणि त्या खिसमसमध्ये प्लम केक बनवण्याची जुनी परंपरा आहे. हा प्लम केकमध्ये ड्रायफ्रुट आणि चेरी यासारखे पदार्थ असतात. या गोष्टी तुम्हाला आरामात बाजारात मिळून जातील तर नक्की हा प्लम केक घरी बनवून बघा. लिहून घ्या याची रेसिपी.

डिसेंबर महिना सुरु आहे आणि या महिन्यात सगळ्यांना ख्रिसमसचे वेध लागतात. ख्रिसमसला स्पेशल बनवण्यासाठी लोक घरच्याघरी किकीज, बिस्किट्स, कप केक यासारखे अनेक पदार्थ बनवतात. तसेच घरात फुग्यांची आणि लायटिंगची सजावट केली जाते. २५ डिसेंबरला हा सण मोठ्या आनंदात साजराला केला जातो. या दिवशी प्लम केक बनवला जातो, ख्रिसमसमध्ये प्लम केक बनवण्याचा खूप जुना इतिहास आहे. या केकमध्ये चेरी, सुकामेवा यासारख्या पदार्थाचा समावेश असतो. हिवाळ्यात हे पदार्थ सहज उपलब्ध होतात. हा केकी अनेक दिवस स्टोअर करू शकता. मोठ्यांपासून ते लहानांपर्यंत सगळे लोक या केकला पसंती देत आले आहे. प्लम केक ख्रिसमसचा आनंद द्विगुणीत करण्याचा एक भाग आहे.

प्लम केक बणवण्यासाठी लागणारे साहित्य :

गव्हाचे पीठ
तेल
सुकामेवा
बेकिंग पावडर
बेकिंग सोडा
दालचिनी पावडर
दूध

प्लम केक बनवण्याची कृती :
ख्रिसमध्ये प्लम केक बनवण्यासाठी सर्वात एक भांड घ्या. त्या भांड्यात ऑरेंज ज्यूस घ्या. मग त्या पाणी मिक्स करून ते मिश्रण मिक्स करा. नंतर त्यात मनुके , चेरी, काळे मनुके, टाका. मंद आचेवर ७ ते ८ मिनिटे ते शिजवा. नंतर एका भांड्यात बारीक गूळ, पाणी मिसळून ते चांगले शिजवा. काचेच्या भांड्यात गुळाचे मिश्रण घ्या. त्यात तेल, दही मिसळून चांगले फेटून घ्या. नंतर त्यात गव्हाचे पीठ गाळून मिसळा, त्यात बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा टाका मग त्यात दालचिनी पावडर टाका. हे मिश्रण चांगले मिसळून घ्या नंतर त्यात सुकामेवा मिक्स करा. या मिश्रणात दूध मिसळून ते मिश्रण चांगले फेटून नंतर एका भांड्यात काढा आणि कढईत किंवा ओव्हनमध्ये ४५ ते ५५ मिनिट शिजू द्या. तुमचा प्लम केलं सर्व्ह करण्यासाठी तयार आहे.

Latest Posts

Don't Miss