spot_img
spot_img

Latest Posts

श्रीकृष्णाचा आवडता दही भात कसा बनवावा? जाणून घ्या ही सोपी रेसिपी…

श्रीकृष्ण हे अनेकांचे आराध्य दैवत आहे. देशभरात अनेक ठिकाणी कृष्णजन्माष्टमी खूप उत्साहाने साजरी केली जाते. यादिवशी कृष्णाची पूजा केली जाते.

श्रीकृष्ण हे अनेकांचे आराध्य दैवत आहे. देशभरात अनेक ठिकाणी कृष्णजन्माष्टमी खूप उत्साहाने साजरी केली जाते. यादिवशी कृष्णाची पूजा केली जाते. मथुरा आणि देशभरातील कृष्णभक्तांसाठी हा दिवस म्हणजेच श्रावण कृष्ण पक्ष अष्टमीच असतो. कृष्णाचे आवडते जेवण म्हणजे दही भात. दही भात हे कृष्णाला खूप आवडायचे. त्यामुळे जन्माष्टमीच्या दिवशी आवर्जून कृष्णाला दही भाताचा नैवेद्य दाखवला जातो. दही भात हे खूप पौष्टिक आहे. लहान मुलापासून ते वयोवृद्ध लोकांपर्यंत सर्वच ते आवडीने खातात. पण हाच दही भात घरच्या घरी कसा तयार करायचा हे आज आपण पाहणार आहोत.

साहित्य –
तांदूळ
दही
दूध
तेल
हिंग
जिरे
मोहरी
लाल सुक्या मिरच्या
किसलेले आले
कढीपत्ता
कोथिबीर
मीठ (आवश्यकतेनुसार)

कृती –
सर्वप्रथम एका भांड्यात तांदूळ हा स्वच्छ धुवा. त्यानंतर कुकरमध्ये तांदूळ शिजवा. तांदूळ शिजल्यावर ते थंड करत ठेवायचे. भात थंड झाल्यानंतर त्यात थोडे थोडे दही आणि दूध घाला. त्यामध्ये चवीनुसार मीठ घाला. त्यात थोडे किसलेलं आले घाला. एका कढईत आवश्यकतेनुसार तेल घाला आणि त्या गरम तेलामध्ये कडीपत्ता, जिरे, मोहरी, हिंग आणि सुक्या लाल मिरच्या टाकून फोडणी द्या. ही फोडणी आता भातावर टाका. त्यात थोडी कोथिंबीर बारीक चिरुन भातावर घाला. दही भात तयार होईल. अशा प्रकारे सोप्या पद्धतीने दही भात तयार आहे.

हे ही वाचा:

Janmashtami 2023, जन्माष्टमीच्या दिवशी दही काला खाण्याचं महत्व घ्या जाणून

Janmashtami 2023, यंदाच्या जन्माअष्टमीनिम्मित जाणून घ्या तारीख, मुहूर्त आणि महत्व

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss