spot_img
Wednesday, March 19, 2025

Latest Posts

उपवासाचे तेच-तेच पदार्थ खाऊन खाऊन कंटाळलात असाल तर; ‘हे’ डेझर्ट नक्की तयार करा

उन्हाळ्याचे दिवस सुरु होत आहेत, त्यामुळे सर्वांना काही तरी थंडगार प्यावसं-खावंसं वाटतं. पण याच उन्हाळ्याच्या दिवसात उपवासाचे दिवस आलेत. त्यामुळे नेहमी तीच साबुदाणा खिचडी खाऊन कंटाळा येतो. त्यावेळी,प्रश्न पडतो की अशावेळी काय करावं जे हेल्दी ही असेल आणि उपवासालाही खाऊ शकतो. त्यामुळे काहीस हटके तरीही उपवासाला चालणारा पदार्थ म्हणजे साबुदाणा फ्रुट डेझर्ट. अत्यंत सोपी आणि टेस्टी रेसिपी नक्की तयार करा.

साबुदाणा फ्रुट डेझर्ट बनवण्यासाठी लागणारे साहित्य :

  • साबुदाणा – १ कप
  • दूध – २ कप
  • साखर – २-३ चमचे (स्वादानुसार)
  • ताजे फळ (केळी, सफरचंद, पपई, द्राक्षं, स्ट्रॉबेरी इत्यादी) – १ कप
  • ड्रायफ्रूट्स (बदाम, काजू, पिस्ता) – १/४ कप
  • वेलची पावडर – १/२ चमच
  • केशर (ऐच्छिक) – काही कणी
  • तूप – १ चमच (स्वादासाठी)

साबुदाणा फ्रुट डेझर्ट बनवण्याची कृती :
सगळ्यात आधी साबुदाण्याला स्वच्छ पाण्यात धुवून घ्यावे. मग त्या साबुदाण्याला ४ ते ५ तास भिजवत ठेवावे. साबुदाणा चांगला भिजला की त्याच पाणी काढून तो एकाबाजूला ठेवून द्या. एका कढईत दूध उकळायला ठेवा. त्या दुधाला मंद आचेवर उकळून घ्या. उकळणाऱ्या दुधात साबुदाणा घाला आणि ते मिश्रण चांगले उकळवत ठेवा. उकळवत असताना साबुदाणा तळाला चिकटणार नाही याची काळजी घ्या. साबुदाणा दूध शोषून घेतो, म्हणून थोड्या वेळासाठी त्याला शिजू द्या. मधून-मधून ढवळत रहा. साबुदाणा चांगला शिजला आणि दूध घट्ट झाल्यावर त्यात साखर घाला आणि सगळे मिश्रण एकजीव करा. मग ताज्या फळांचे छोटे तुकडे करा आणि ड्रायफ्रूट्स (बदाम, काजू, पिस्ता) कापून त्यात घाला. सर्व घटक चांगले मिक्स करा.त्यात वेलची पावडर आणि ऐच्छिक केशर घाला. यामुळे डेसर्टला अधिक चव आणि रंग येईल. त्यानंतर ते मिश्रण फ्रिजमध्ये १ ते २ तास ठेऊन द्या. मस्त चिल्ड झाल्यानंतर तुम्ही ते सर्व्ह करु शकता.

हे ही वाचा : 

Bank Holidays in April 2023, एप्रिल महिन्यात बँका तब्बल १५ दिवस बंद, जाणून घ्या सुट्ट्याची यादी

Chaitra Navratri Sabudana Kheer Recipe, उपवास आहे? तर घरच्या घरी बनवा साबुदाणा खीर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss