अनेकदा रोज-रोजचे जेवण थोडे कंटाळवाणे वाटू लागते, रोजच्या आहारामध्ये रोज नेहमीचेच जेवण असल्यामुळे अनेकांना ते नकोसे वाटते. जर घरात लहान मुलं असतील तर त्यांना ही नव-नवीन पदार्थ खायला लागतात. जर तेच त्यांच्या आवडीचे पदार्थ असेल तर ते पोट भरून जेवतात. अश्यात जर तुम्हाला आणि तुमच्या मुलांना काहीतरी नवीन आणि चविष्ट खायचे असेल तर पुलाव हा उत्तम पर्याय आहे. घरी जर तुम्हाला रेस्टॉरंट सारखा पुलाव बनवून खायचा असेल तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा.
पुलाव बनवण्यासाठी साहित्य –
१) तांदूळ २ कप भिजवलेले
२) कांदा १ मोठा
३) लसूण ३ ते ४ पाकळ्या बारीक चिरलेल्या
४) आले १ इंच चिरलेले
५) तेल २ नवटके
६) गाजर १ मोठे
७) वाटाणे १ कप
८) कोबी आर्धा कप चिरलेला
९) हिरवी मिरची ३ ते चार
१०) दही दीड कप
११) हळद आर्धा चमचा
१२) धने पावडर १ चमचा
१३) जिरे पावडर आर्धा चमचा
१४) मिरची पावडर आर्धा चमचा
१५) मीठ चवीनुसार
१६) पाणी ३ कप
१७) लवंग, काळीमिरी ४ ते ५
१८) तमालपत्र, दालचिनी २
कृती
सर्वप्रथम कढई गॅसवर ठेवून त्यामध्ये तेल गरम करून त्यात जिरे, तमालपत्र, दालचिनी, लवंग आणि काळी मिरी घालून चांगले फ्राय करा. आता त्याच पॅनमध्ये चिरलेला कांदा, लसूण आणि आले घालून सोनेरी रंगाचे होईपर्यंत परतून घ्या. ते चांगले सोनेरी रंगाचे झाल्या नंतर त्यामध्ये गाजर, वाटाणे, फ्लॉवर आणि हिरवी, मिरची घालून काही मिनिटे मंद आचेवर फ्राय करून घ्या. हे सर्व एक जीव झाल्यावर त्यामध्ये हळद, जिरेपूड, धनेपूड, तिखट आणि गरम मसाला घालून मिक्स करा. नंतर दही थोड्या पाण्यामध्ये विरघळून ते भाज्यांमध्ये घालून चांगले मिक्स करा. आता यात भिजवलेले तांदूळ घालून एकजीव करा. आता यात ३ कप वरून पाणी टाका आणि चवीनुसार मीठ घाला. आता यावरती झाकण ठेऊन मध्यम आचेवर १५ ते २० मिनिटे भात शिजवा. भात शिजल्यावर ५ ते ६ मिनिटे तसेच राहूद्या आणीन नंतर सर्व्ह करा. तयार आहे, हॉटेल सारखा पुलाव….
हे ही वाचा:
मनोज जरांगेनी सांगितले, विधानसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाला किंवा अपक्षाला पाठिंबा…
अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांना दिले थेट आव्हान…, म्हणाले…