Kabuli Chana Recipe : हिवाळ्यात बनवा पौष्टिक काबुली चन्यापासून ‘ही’ रेसिपी; वाचा साहित्य आणि कृती
हिवाळा सुरु आहे आणि या हिवाळ्यात सकाळी पौष्टिक नाश्त्यासाठी काय बनवायचं हा प्रश्न नेहमी आपल्याला पडतो. कांदे पोहे, उपमा हे पदार्थ खाऊन मुलंही कंटाळतात. त्यामुळे काबुली चन्याचे टेस्टी कबाबची बनवून बघा त्यासाठी नक्की वाचा साहित्य आणि कृती
काबुली चन्याचे कबाब बनवण्याचे साहित्य :
> १ कप भिजलेले काबुली चने
> १ कप पनीर
> १ कप उकडलेला बटाटा
> ६ चमचे तूप
> २ चमचा तेल
> २ चमचा बारीक चिरलेली कोथिंबीर
> ४ बारीक चिरलेल्या मिरच्या
> १ चमचा जीरे
> २ चमचा धने पावडर
> १ चमचा गरम मसाला
> १ चमचा आमचूर पावडर
> १/२ चमचा लाल मिरची पावडर
> मीठ चवीनुसार
काबुली चन्याचे कबाब बनवण्याची कृती :
प्रथम, काबुली चण्याला चांगले स्वच्छ धुऊन, रात्री पाणी घालून भिजवून ठेवा. दुसऱ्या दिवशी ते पूर्णपणे उकडून मऊ करुन घ्या. उकडलेल्या चण्याची मिक्सर मध्ये चांगली पेस्ट करून घ्या. ह्याच वेळी त्यात बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, आले, लसूण पेस्ट, बेसन, लाल तिखट, हळद, गरम मसाला, जिरे पावडर, धणे पावडर, कोथिंबीर आणि लिंबाचा रस घाला. नंतर त्यात आमचूर पावडर, लाल तिखट, मीठ टाकून मिश्रण परतून एकजीव करा. दुसऱ्या एका बाऊलमध्ये बटाटा आणि पनीर एकत्र कुस्करून घ्या आणि त्यात मिक्सरमधली चन्याची पेस्ट टाका. या मिश्रणाचे छोटे छोटे कबाब तयार करा. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गोल किंवा चौरस आकार देऊ शकता. कढईत तेल गरम करून त्यात कबाब तळायला ठेवा. हे कबाब हलक्या आचेवर क्रिस्प आणि सोनेरी रंग येईपर्यंत तळा. गरमागरम काबुली चना कबाब ताज्या कच्च्या कोथिंबीर, कांदालिंबू आणि टोमॅटो चटणीसह सर्व्ह करा.
हे ही वाचा:
Eknath Shinde Live: विधानसभेत मिळालेला विजय ऐतिहासिक, मी कॉमन मॅन म्हणून….काय म्हणाले एकनाथ शिंदे?
लोकसभेच्या निवडणूकीतून आम्ही जे शिकलो तसं महाविकास आघाडीने शिकलं पाहीजे: Chandrashekhar Bawankule